शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचे धान्य खुल्या बाजारात, तांदूळ दहा रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:40 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : शासन दारिद्र्यरेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्नपुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : शासन दारिद्र्यरेषेखालील, अंत्योदय व केशरी कार्डधारकांना अन्नपुरवठा करते. महिन्याकाठी मिळणारे रेशन आता काही लाभार्थी विक्री करीत असतात. काही लाभार्थी तांदूळ तर काही लोक गहू विक्री करीत असतात. जिल्ह्यात भात खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पोळीशिवाय राहणारे लाेक तांदुळाचा वापर करून रेशनचे मिळणारे दोन रुपये किलोचे गहू शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ८ ते १० रुपये किलोने विक्री करतात. शासनाने रेशनमध्ये प्रतिव्यक्ती असा रेशनचा कोटा ठरविल्यामुळे जे लोक तांदुळाचा वापर करतात त्यांना रेशन दुकानातून मिळणारे रेशन हे त्यांच्या तुलनेत कमी असते; परंतु गहू मिळत असल्याने गव्हाचा वापर करीत नाहीत.

गव्हाच्या ठिकाणी ते तांदुळाचाच वापर करतात. त्यामुळे रेशन दुकानातून मिळालेले २ रुपये किलोचे गहू ८ ते १० रुपये किलोने खुल्या बाजारातही विकले जातात. याशिवाय ओळखीच्या व्यक्तींनाही त्याची विक्री केली जाते. काही लोक गव्हाचा वापर करतात; परंतु ते तांदूळ दुसऱ्या लोकांना विक्री करतात. तांदूळ १० रुपये किलोने विकून मिळालेल्या पैशांतून गहू खरेदी करतात.

बॉक्स

३ रुपये किलो तांदूळ

अंत्योदय योजनेचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना महिन्याकाठी ३५ किलो रेशन मिळते. २५ किलो तांदूळ व १० किलो गहू मिळतात. तांदूळ तीन रुपये तर गहू दोन रुपये किलोने रेशन दुकानातून मिळत असतात.

बॉक्स

कारवाई करावी तरी कशी?

अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप केले जाते. लाभार्थ्यांना धान्य वाटप केल्यानंतर त्याचे ते काय करतात हे कुणालाही सांगता येत नाही. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे बरोबर वितरण होते किंवा नाही याची चाचपणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून केली जात असते. मात्र तक्रार असल्याशिवाय कुणीही कारवाई करू शकत नाही. तसेच रेशनचे धान्य बाहेर लाभार्थी विक्री करीत असल्यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाला तक्रारीही प्राप्त होत नाहीत. एनकेन प्रकरणीच पुरवठा विभाग तक्रारीनंतर कारवाई करीत असतात. यामुळेच रेशनचे धान्य खुल्या बाजारात विकण्याच्या प्रमाणावर अंकुश लागलेला नाही.

बॉक्स

अशी आहे महसूल तालुक्यांची स्थिती

तुमसर

तुमसर शहरासह ग्रामीण भागातील लोकांना मिळणारे रेशन लाभार्थी संपूर्ण न वापरता काही धान्य दुसऱ्यांना अधिक किमतीत विक्री करतात, त्यामुळे खरे लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत.

भंडारा

भंडारा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळत असल्याने ते शेतातील अन्न वापरतात आणि अंत्योदय योजनेचे रेशन दुसऱ्यांना कमी किमतीत विक्री करीत असतात.

साकोली

साकोली तालुक्यात सर्वाधिक वापर तांदुळाचा होत असल्याचे दिसून येते. गव्हाचा वापर कमी प्रमाणात होत असल्याने मिळणारे गहू हे अधिक किमतीत गव्हाची मागणी करणाऱ्यांना विकले जातात.