शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

उचल आदेशासाठी रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:36 IST

लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत झालेल्या खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल न झाल्याने तालुक्यातील ...

लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत झालेल्या खरेदी करण्यात आलेल्या धान्याची उचल न झाल्याने तालुक्यातील सर्व गोदामे फुल्ल झाली आहेत. या परिस्थितीत आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत उघड्यावर धान खरेदी सुरू झाल्याने संभाव्य हानीचा धोका टाळण्यासाठी शासनाने तात्काळ उचल आदेश निर्गमित करण्याच्या मागणीला घेऊन रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. सदर रस्ता रोको आंदोलन येत्या २७ जानेवारी रोजी तालुक्यातील साकोली - वडसा या राज्य मार्गावरील बाराव्हा फाटा येथे माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांचे नेतृत्वात व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरीपात शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तालुक्‍यात एकूण १४ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रांतर्गत गत काही महिन्यांपासून नियमित खरेदी सुरू आहे मात्र सदर खरेदी अंतर्गत तालुक्यात एकाही केंद्राला उचल आदेश न देण्यात आल्याने सर्वचे सर्व केंद्र धान पोत्यांनी फुल्ल झाले आहेत. या परिस्थितीत तालुक्यातील काही केंद्रांतर्गत उघड्यावर धान खरेदी देखील सुरू करण्यात आली आहे.

सदर परिस्थिती लक्षात घेता शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रांना तात्काळ उचल आदेश निर्गमित करण्याच्या मागणीला घेऊन येत्या २७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता तालुक्यातील बारव्हा फाट्यावर रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील व परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या आंदोलनाचे आयोजन चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केली आहे.