शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस धुव्वाधार, पण जलप्रकल्प तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:38 IST

चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.

ठळक मुद्दे१८ टक्केच जलसाठा : दीड महिन्यात वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना आहे.दीर्घ विश्रांतीनंतर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. मंगळवारपर्यंत संततधार पाऊस कोसळला. जिल्ह्यात १ जून ते १८ जुलै पर्यंत ५३५.३ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या जवळपास निम्मा आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ५८८.२ मिमी त्याखालोखाल भंडारा ५५९.८ मिमी, मोहाडी ५४२.९ मिमी, तुमसर ५२७.२ मिमी, पवनी ७७९.४ मिमी, लाखांदूर ५२९.५ मिमी, लाखनी ५२०.४ मिमी झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ २८६.१ मिमी पाऊस झाला.या पावसाने जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आले. अनेक गावातील घरांना पुराचा फटका बसला. काही घरांचे अंशत: नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकसान झालेल्या भागाचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.सर्वत्र धुव्वाधार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र १८.७२२ टक्के जलसाठा आहे. त्यात चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार मध्यम प्रकल्पात केवळ १६.४३ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये २१.१३ टक्के आणि माजी मालगुजारी तलावांमध्ये १९.५८ टक्के जलसाठा आहे. पाऊस दमदार होऊनही जलसाठा वाढला नाही. त्यामुळे आणखी धुव्वाधार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान गत तीन दिवसाच्या पावसाने रोवणीच्या कामाला जिल्ह्यात वेग आला आहे.मध्यम प्रकल्पात १६.४३ टक्के पाणीतुमसर तालुक्यातील चांदपूर प्रकल्पात ११.३३ टक्के, बघेडा प्रकल्पात ५९.८६ टक्के, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली प्रकल्पात २३.२६ टक्के आणि सोरणा प्रकल्पात केवळ ३.४१ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे जलसाठ्यात वाढ झाली नाही. सध्या या प्रकल्पात ०.९७८ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.