शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत रेल्वे फाटक तुटले; दोन तास वाहतूक ठप्प

By admin | Updated: February 7, 2016 01:16 IST

तुमसर रोड येथे एका अज्ञात वाहनाने रेल्वे फाटकाला धडक दिली. यात फाटक मध्यभागातून वाकली.

तुमसर रोड येथील घटना : फरार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलतुमसर : तुमसर रोड येथे एका अज्ञात वाहनाने रेल्वे फाटकाला धडक दिली. यात फाटक मध्यभागातून वाकली. यामुळे तुमसर गोंदिया राज्य महामार्गावर सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली. रेल्वे प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून फाटक दुरुस्त केली. ही घटना शनिवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली.तुमसर रोड येथे मुंबई - हावडा रेल्वे मार्गावरील फाटक क्रमांक ५३२ ला एका अज्ञात वाहनाने धडक मारली. धडकेत फाटक मध्यभागातून वाकली. धडक दिल्यावर वाहनचालक फरार झाला. अज्ञात वाहनचालकाविरोधात रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तुमसर गोंदिया राज्य महामार्ग वर्दळीचा आहे. दर पाच ते सात मिनिटांनी येथे रेल्वे फाटक बंद होते. प्रचंड वाहतुकीमुळे फाटकाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा येथे दिसतात. फाटक बंद होताना व उघडताना वाहनांची एकच वर्दळ सुरु होते. अशातच वाहनांची रेल्वे फाटकाला नेहमीच धडक दिल्याच्या घटना घडतात. रेल्वे प्रशासनाने या फाटकावर सीसीटीव्ही लावणे गरजेचे आहे. परंतु त्याची दखल अजूनपर्यंत घेतली गेली नाही. फाटक दुरुस्तीपर्यंत फाटकाच्या दुतर्फा रांगाच रांगा येथे लागल्या होत्या. याच मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीला रस्ता अरुंद पडत आहे. रेल्वे प्रशासनाने या फाटकावर कायमस्वरुपी रेल्वे पोलीस तैनात करण्याची गरज आहे.दि. १२ फेब्रुवारी रोजी रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा आहे. त्यानिमित्ताने रेल्वे स्थानक व परिसराचा कायपालट करणे सुरु आहे. दर महिन्याला या रेल्वे फाटकावर अपघात घडतात. रेल्वे हायटेक करण्याचे रेल्वे मंत्रालयाचे स्वप्न असून जागतिक दर्जाचे रेल्वे मार्ग व सुविधा देण्याची हमी सध्या केंद्र शासन देत आहे. मुंबी हावडा रेल्वे मार्ग तथा तुमसर गोंदिया राज्य महामार्ग अपघात प्रवण स्थळ बनले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)