शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

क्वारंटाईन नागरिकांनी केला शाळा परिसर स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

मुंबई, पुणे, कल्याणसह राज्यातील व परराज्यातील अन्य महानगरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून हसारा येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या नागरिकांनी शाळेत ठेवण्यात आले आहे. १४ दिवसांचा त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी होता. हाताला काम नसल्याने त्यांनाही कंटाळवाणे होत होते.

ठळक मुद्देचौदा दिवसाचा कालावधी केला पूर्ण, कोविड समितीने फुलांचा वर्षांव करून दिला निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरालगतच्या हसारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले. या कालावधीचा त्यांनी शाळा स्वच्छता तसेच बागेच्या सौंदर्यीकरणासाठी सदुपयोग केला. यामुळे हसारा शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर झाला आहे.हसारा गावात मुंबई, पुणे, कल्याणसह राज्यातील व परराज्यातील अन्य महानगरातून आलेल्या नागरिकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून हसारा येथील जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार बाहेरून आलेल्या नागरिकांनी शाळेत ठेवण्यात आले आहे. १४ दिवसांचा त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी होता. हाताला काम नसल्याने त्यांनाही कंटाळवाणे होत होते. अशात मात्र मिळालेल्या या वेळेचा काही चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा, या उद्देशातून आपण जेथे राहत आहोत त्या शाळेचीच स्वच्छता करण्याचा निर्णय क्वारंटाईन झालेल्या युवकांनी घेतला. तेथून शाळा स्वच्छतेचे व क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींनी शाळेची साफसफाईची कामे केली.या केंद्रातील नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, कोरोना समिती, तलाठी व आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील यानी वेळोवेळी आपले कर्तव्य पार पाडली. क्वारंटाईनचे सर्व नियम पाळून हसत खेळत ते १४ दिवसांचा क्वारंटाईन काळ कसा निघून गेला, ते कळलेच नाही. अगदी भावुक होऊन क्वारंटाईन झालेल्यानागरिकांवर फुलांचा वर्षाव करून त्यांना निरोप देण्यात आला.ग्रामस्थांचे सहकार्यतुमसर तालुक्यातील हसारा येथे परजिल्ह्यासह राज्यातील आलेल्या युवकांना शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे पालन होणे गरजेचे आहे. यासाठी क्वारंटाईन झालेल्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करुन आपल्या नागरिकत्वाचे परंपरा जोपासली. याला गावातील युवकांनी प्रतिसाद दिला.उन्हाळ्यातही झाडे हिरवीगारतुमसर तालुक्यातील हसारा येथे क्वारंटाईन असलेल्या युवक व नागरिकांनी वेळेचा सदुपयोग करुन शाळा परिसर स्वच्छ करुन येथील वृक्षांना भर उन्हाळ्यातही हिरवीगार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने शाळा परिसरातील बागेतील फुल व अन्य झाडांची निगा राखणे बंद असल्याने ते कोमेजले होते. या व्यक्तींनी बागेत सफाई करून झाडांना पाणी देवून, केरकचरा काढल्याने आता झाडेही डोलू लागली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या