शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५० हजार क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:25 IST

दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देआधारभूत केंद्र : भंडाराच्या इतिहासात आॅक्टोबरमध्ये पहिल्यांदाच विक्रमी खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांच्या घरी आलेल्या धानांची आता शेतकरी दिवाळीच्या तोंडावर विक्री करीत आहेत. शासनाने सुरु केलेल्या जिल्हाभरातील आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले जाणार आहेत.भंडारा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने धानपीक संकटात आले. एका पाण्याअभावी धानाचे उत्पन्न घटले. गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी धान काढणीला प्रारंभ केला. काढलेला धान घरी येत आहे. दिवाळी तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना हा धान विकावा लागत आहे. गतवर्षी पर्यंत शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे आधारभूत धान खरेदी केंद्र उशिरा सुरु व्हायचे. शेतकऱ्यांना त्यांच्या धानाचा योग्य मोबदला मिळत नव्हता.यावर्षी शासनाने पहिल्यांदाच आॅक्टोबर महिन्यात धान खरेदीचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी ६६ खरेदी केंद्रांना मंजुरी दिली. आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ५५ केंद्रांवर धान खरेदी सुरु झाली. शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपला धान घेऊन येत आहेत. हमीभावात धान खरेदी केला जात असून वजनातही कुठे गडबड होत नसल्याचा आधारभूत केंद्रांचा दावा आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धान घेऊन शेतकरी येत आहे. गत आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विविध आधारभूत केंद्रांवर तब्बल ५० हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. या धानाचे पैसेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार आहे. साकोली तालुक्यातील आधारभूत केंद्रावर खरेदी केलेल्या धानाचे पैसे शेतकºयांच्या खात्यात वळते करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे दिवाळीचा सण शेतकºयांना आनंदात साजरा करण्यास मदत होणार आहे.जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटअपुऱ्या पावसामुळे भंडारा जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. धानाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येत असल्याचे शेतकरी बोलत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्रावर महिनाभरात ५० हजार क्विंटल धान विक्रीस आले आहे. हा धान शेतकऱ्यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकला. त्यामुळे महिनाभरात मोठी विक्री झाल्याचे दिसून येते. दिवाळी नंतर धान केंद्रावर गर्दी ओसरेल असे बोलले जात आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन निम्म्यावर येण्याची शक्यता आहे. आता शासनाने भंडारा जिल्ह्यातील सातही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याची आवश्यकता आहे. परंतु आतापर्यंत तीनच तालुक्यात दुष्काळ घोषित केल्याने चार तालुक्यावर अन्याय होत आहे.