पं. उपाध्याय यांनी दिली ‘मानव एकात्मवादा’ची देणगी

By Admin | Updated: September 27, 2016 00:35 IST2016-09-27T00:35:57+5:302016-09-27T00:35:57+5:30

साधी राहणी असून पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी भारताला राजकीय आदर्शस्थान निर्माण करून दिले,...

Pt Upadhyay donated the donation of 'Man Ekantvada' | पं. उपाध्याय यांनी दिली ‘मानव एकात्मवादा’ची देणगी

पं. उपाध्याय यांनी दिली ‘मानव एकात्मवादा’ची देणगी

लाखनीत व्याख्यानमाला : अनिल सोले यांचे प्रतिपादन
लाखनी: साधी राहणी असून पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी भारताला राजकीय आदर्शस्थान निर्माण करून दिले, गरीब आणि दीन दुबळ्यासाठी त्यांनी अंत्योदयाची संकल्पना मांडली. पंडित उपाध्याय यांनी मानव एकात्मवाद भारताला दिलेली देणगी आहे, असे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.
राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद वाचनालय तथा भाजपा याच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी व्याख्यानमाला घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळा काशिवार होते. प्रमुख वक्ते विधान परिषदेचे आमदार अनिल सोले आणि प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, उमराव बावनकुळे उपस्थित होते.
पंडितजी हे राजकारणातील आदर्श पुरुष असे आमदार बाळा काशिवार आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. भास्कर पिंपळे यांनी 'चरैवेति चरैवेति' हे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे गीत गाऊन सभागृह मंत्रमुग्ध केले. डॉ. हेमकृष्ण कापगते, डॉ.श्याम झिंगरे, उत्तमराव वरकड, भरत खंडाईत, छबिलाल रहांगडाले, नीरज मिश्राम, पदमाकर बावनकर, गोवर्धन शेंडे, नाना रहाटे, देवराव चाचेरे, डेबूजी धांडे, श्रावण कापगते, नगरसेवक कौस्तुभ भांडारकर, महेश आखरे, ज्योती निखाडे उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप भांडारकर, संचालन अजिंक्य भांडारकर, आभार कोमल गभणे यांनी केले. कार्यक्रमासाठी पवन पडोळे, अशोक धरमसारे, अतुल नागपुरे यांनी सहकार्य केले. ( शहर प्रतिनिधी)

Web Title: Pt Upadhyay donated the donation of 'Man Ekantvada'