शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींच्या निर्णयाला बसला प्रस्तावाचा फटका

By admin | Updated: September 16, 2014 23:31 IST

भंडारा जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयातील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयात पोहचला नाही. परिणामी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या प्रस्तावामुळे

प्रक्रिया रखडली : ग्रामविकास खात्याऐवजी प्रस्ताव पोहोचला नगरविकास खात्याकडेसंजय साठवणे - साकोली भंडारा जिल्ह्यातील चार तालुका मुख्यालयातील ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा प्रस्ताव ग्रामविकास मंत्रालयात पोहचला नाही. परिणामी जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या प्रस्तावामुळे राज्यभरातील निर्णय प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. एका जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका राज्यातील ग्रामपंचायतीना कारणीभूत ठरला आहे.महाराष्ट्र राज्यातील तालुकास्तरीय ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतला होता. त्यानुसार राज्यातील १३९ ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रुपांतर होणार होते. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व तहसील कार्यालयातून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र या प्रक्रियेचा अंतिम अहवाल जिल्हा परिषदेला मंत्रालयात पाठवायचा होता. परंतु, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवाल न पाठविल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील नगरपंचायतची घोषणा झाली नाही.साकोली, लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी या चार ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरु झाल्या होत्या. यावरून ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतने ठराव घेतला. ग्रामपंचायतने हा ठराव पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाकडे पाठविला. त्यानंतर नगरपंचायतीचा जाहिरनामा त्या-त्या ग्रामपंचायतीत काढण्यात आला. एकंदरीत तालुका पातळीवर होणारी ही प्रक्रिया तालुका प्रशासनाने पूर्ण करून संपूर्ण कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली. या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सपाटे व दिलीप मासूरकर यांनी या प्रकरणाची चौकशी करीत मुंबई गाठली. ग्रामीण विकास मंत्रालयात चौकशी केली असता भंडारा जिल्हा परिषदेने चारही ग्रामपंचायतीचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला न्सासल्याची माहिती उघडकीस आली. त्यामुळे त्यांनी आज मंगळवारला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन या प्रकरणाविषयी चर्चा केली असता या संपूर्ण अहवाल ग्रामविकास मंत्रालयात न पाठविता हा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. या चुकीमुळे नगरपंचायतीची प्रक्रिया मात्र रखडल्या गेली आहे.