प्रो कबड्डी स्पर्धक आकाश पिकलमुंडेचा खासदारांनी केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:39 IST2021-09-05T04:39:30+5:302021-09-05T04:39:30+5:30

प्रतिष्ठेच्या अशा प्रो कबड्डी स्पर्धेत ७०० हून अधिक खेळाडूंमधून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील आकाश याची निवड करण्यात ...

Pro Kabaddi contestant Akash Picklemunde was felicitated by the MPs | प्रो कबड्डी स्पर्धक आकाश पिकलमुंडेचा खासदारांनी केला सत्कार

प्रो कबड्डी स्पर्धक आकाश पिकलमुंडेचा खासदारांनी केला सत्कार

प्रतिष्ठेच्या अशा प्रो कबड्डी स्पर्धेत ७०० हून अधिक खेळाडूंमधून भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील आकाश याची निवड करण्यात आली. आकाशची निवड ही भंडारासाठी अभिमानाची गोष्ट आहे. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जिल्ह्याची कीर्ती सर्वदूर पसरवावी, अशी अपेक्षा खासदार मेंढे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच खेळ व खेळासंबंधी असलेली प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी आपण सोबत आहोत असा विश्वास यावेळी त्यांनी दिला. तो बंगाल वॉरियर्स संघाकडून क्रमांक दोनचा रायडर म्हणून खेळणार आहे. आकाशच्या निमित्ताने भंडारा जिल्हा देशपातळीवर गौरविला गेला असून, त्याचे कौतुक खासदार कार्यालयात करण्यात आले.

यावेळी मुकेश थानथराटे, चैतन्य उमाळकर, नितीन कडव, मयूर बिसेन, पप्पू भोपे, अजीज शेख, विकास मदनकर, सूर्यकांत इलमे, कृष्णकुमार बत्रा, कैलास तांडेकर, मनोज बोरकर, आशिष गोंडाणे, वनिता कुथे, गीता सिडाम, राजू व्यास, रोशन काटेखाये, भूपेंद्र तलमले, यश ठाकरे, अनुप ढोके, प्रशांत पुरुषार्थी, आदी उपस्थित होते.

Web Title: Pro Kabaddi contestant Akash Picklemunde was felicitated by the MPs