शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

आरोग्याला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 5:00 AM

शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, खतासाठी कृषी सेवा केंद्र शेतकºयांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. घरकुल, रस्ते, खते, बियाणे, पाणी पुरवठा योजना व आरोग्य आदी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पीक कर्ज व कर्जमुक्तीबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली.

ठळक मुद्देविश्वजीत कदम : मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी व भंडारात आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना आजाराचा संसर्ग वाढत असून नागरिकांना आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती घालवणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे व काळजी घेणे यामुळे आपण कोरोनावर नक्की मात करू, असा विश्वास देतानांच नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्रधान्य द्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रशासन व यंत्रणेला दिल्या.मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी व भंडारा येथील कोरोनाचा पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी शुक्रवारला आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, मोहाडीचे तहसीलदार डी. सी. बोंबर्डे, तुमसरचे तहसीलदार गजेंद्र बालपांडे, साकोलीचे तहसीलदार बाळासाहेब टेळे, लाखांदूरचे तहसीलदार संतोष महल्ले, लाखनी तहसीलदार मलिक विराणी, आरोग्य अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.या दौऱ्यात पालकमंत्र्यांनी कोरोना व आरोग्याचा आढावा घेतला. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य असून कोरोनापासून मुक्ती हे ध्येय यंत्रणांनी ठेवावे असे ते म्हणाले. मृत्यू संख्या कमी ठेवण्याला प्राधान्य द्या. नागरिकांचे जीव महत्वाचे असून आरोग्य यंत्रणेने विनाविलंब आरोग्यसेवा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत मिळणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, खतासाठी कृषी सेवा केंद्र शेतकºयांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.घरकुल, रस्ते, खते, बियाणे, पाणी पुरवठा योजना व आरोग्य आदी विषयाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पीक कर्ज व कर्जमुक्तीबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली.तुमसर येथील नेहरू विद्यालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. या दौºयात पालकमंत्र्यांनी नगरपरिषद पदाधिकारी व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली. नगरपरिषदचे विविध प्रश्न व समस्यांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. पाणी पुरवठा, स्वच्छता, घरकुल, रस्ते व कोविड आदी बाबत पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना अवगत केले.साकोली तालुक्यात गावस्तरीय समित्या स्थापन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. काही गावांनी अतिशय उत्कृष्ट काम केल्याचे सांगण्यात आले. यावर बोलतांना पालकमंत्री म्हणाले, ज्या ग्रामपंचायतनी उत्कृष्ट काम केले त्यांचे पत्र लिहून अभिनंदन करा.लाखनी तालुक्याचा आढावा तहसीलदारांनी सादर केला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच जनजीवन सुरळीत होईल याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सध्या शेतीचा हंगाम असून पीक कर्ज व बी-बियाणे वाटपात कुठलीही अडचण येता काम नये असे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.पालकमंत्र्यांकडून कारेमोरे कुटुंबाचे सांत्वनआमदार राजू कारेमोरे यांचे भाऊ रामेश्वर माणिकराव कारेमोरे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी एकलारी (वरठी) येथे त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आमदार राजू कारेमोरे, वडील माणिकराव कारेमोरे व कारेमोरे कुटुंबातील सदस्य, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, जिया पटेल उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य