शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दोन अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या

By admin | Updated: May 29, 2016 00:37 IST

तुमसर तालुक्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने मुदतपूर्व बदल्या केल्याची माहिती आहे.

तुमसर : तुमसर तालुक्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने मुदतपूर्व बदल्या केल्याची माहिती आहे. यात तुमसरचे पोलीस निरीक्षक व दुसरे तुमसर पंचायत समितीचे खंडविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे.पूर्व विदर्भातील शेवटच्या टोकावर तुमसर तालुका आहे. राज्य शासन नियमाप्रमाणे दरवर्षी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करते. उन्हाळ्यात बहुधा सर्वच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. तुमसर येथील पोलीस निरीक्षक किशोर गवई यांचे स्थानांतरण अमरावती (ग्रामीण) येथे झाल्याची माहिती आहे. त्यांचा तुमसरात केवळ २ वर्षे ३ महिन्यांचा कार्यकाळ झाला होता. एक कर्तव्यदक्ष तथा त्यांच्या कार्यकाळात शांतता, सुव्यवस्था व असामाजिक तत्वांच्या लोकांच्या त्यांनी मुसक्या आवळून दरारा निर्माण केला होता. तत्पूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी बुरडे यांचे केवळ सहा महिन्यातच स्थानांतरण झाले होते.राज्यातील ७० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली असून दि. ३० मे रोजी मॅटचा निकाल लागणार आहे. तुमसरचे खंडविकास अधिकारी केशव गड्डापोड यांचेही स्थानांतरण झाल्याचे समजते. त्यांना शुक्रवारी कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी रिलीव्ह केल्याची माहिती आहे. तुमसरात गड्डापोड केवळ एकच वर्षे राहिले हे विशेष.मी वैद्यकीय रजा घेतली होती. मी पुण्याला प्रशिक्षणाला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला आज रिलीव्ह केले असे त्यांनी लोकमतला सांगितले. पं.स. पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर लावलेले आरोपात तथ्य नाही. नियमानुसार मी सर्व माहिती सदस्यांना देत होतो अशी पुष्टीही त्यांनी जोडली. (तालुका प्रतिनिधी)