शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदुरातील आठ पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

गत वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाकडून वीज बिल माफ होण्याचा अंदाज नागरिकांमध्ये व्यक्त केला जात होता. या अंदाजानुसार तालुक्यातील विविध संस्था व नागरिकांनी वीज बिलाचा भरणा न केल्याची देखील चर्चा आहे. यावेळी वीज बिल कंपनीद्वारा थकीत वीज बिल वसुली व वीज बिलाचा भरणा न करण्यावर वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.

ठळक मुद्देथकीत वीज बिलाचा परिणाम : गावकऱ्यांत पाणीपुरवठ्याअभावी संताप

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : गत काही महिन्यांपासून ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे तालुक्यातील आठ पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित झाला आहे. या योजनेचा वीज खंडित झाल्याने गावकऱ्यांत पाणीपुरवठ्याअभावी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गत वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाकडून वीज बिल माफ होण्याचा अंदाज नागरिकांमध्ये व्यक्त केला जात होता. या अंदाजानुसार तालुक्यातील विविध संस्था व नागरिकांनी वीज बिलाचा भरणा न केल्याची देखील चर्चा आहे. यावेळी वीज बिल कंपनीद्वारा थकीत वीज बिल वसुली व वीज बिलाचा भरणा न करण्यावर वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.या मोहिमेंतर्गत गत अनेक महिन्यांपासून तालुक्यातील आठ ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्यामुळे त्यांची वीज तोडण्यात आली आहे. तालुक्यातील मुर्झा, मानेगाव, धर्मापुरी, तई (बुज), खैरी, ढोलसर, भागडी व नांदेड आदी गावांतील पाणीपुरवठा योजनेची विद्युत खंडित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांद्वारा कराचा भरणा न केल्याने सदर वीज खंडितची समस्या उद्भवली असल्याची चर्चा केली जात आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ववत होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत केली जात आहे.

बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा पिण्यासाठी वापरवीज बिलाचा भरणा न केल्याने तालुक्यातील आठ गावांतील पाणीपुरवठा योजनेची वीज तोडण्यात आली. यामुळे सदर गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. संबंधित गावात पिण्यासाठी बोअरवेल व विहिरीच्या पाण्याचा वापर होत असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Waterपाणी