कामांमध्ये पारदर्शकतेसाठी पोलीस मित्रांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 00:48 IST2015-12-17T00:48:50+5:302015-12-17T00:48:50+5:30

नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

Police need friends for transparency in the work | कामांमध्ये पारदर्शकतेसाठी पोलीस मित्रांची गरज

कामांमध्ये पारदर्शकतेसाठी पोलीस मित्रांची गरज

साकोली : नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. पोलिसांप्रती नागरिकांच्या मनातून भीती दूर व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. पोलिसांच्या कामात पारदर्शकता यावी, यासाठी पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आली. दैनंदिन जीवनात शांतता टिकून ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सुरेश धुसर यांनी केले.
साकोली येथे पोलीस मित्र रॅली दरम्यान उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गावातील प्रमुखमार्गानी ही रॅली काढण्यात आली. यानंतर बसस्थानक परिससरात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध गावातून जवळपास दोनशे पोलीस मित्रांची निवड करण्यात आली. या पोलीस मित्र संकल्पनेला व निघालेल्या रॅलीला जनतेने उत्कृष्ट सहयोग दिला. तसेच ज्यांची इच्छा असेल अशांनी थेट पोलीस ठाणे येथे संपर्क साधून पोलीस मित्र म्हणून सहभागी होता येईल, असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक धुसर यांनी केले.
यावेळी इंद्रायनी कापगते, ताराबाई तुरजुले, गिता कापगते, उषा आंबेडारे, शालु नंदेश्वर, मनिषा काशीवार, फीरोज खान, अर्शद पठाण, जितेंद्र रामटेके, उमेश मेश्राम, पोलिस पाटील मारोती झोडे, मदनपाल मेश्राम, माधोराव कापगते, शेखर निर्वाण, उमराव मल्लानी, पोलीस उपनिरीक्षक चुटे, करांडे, गोंडाने, बावने, पोलीस हवालदार मनीराम गोबाडे, भुतांगे, परशुरामकर, बागडे, रामटेके, कांबळे, भजनकर, खडसे, मिलिंद बोरकर, मस्के यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Police need friends for transparency in the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.