शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यासह पोलिसांनी प्लाझ्मा दान करून जपले सामाजिक भान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे बाधित रुग्णांना प्लाझ्मा हा जीवनदान ठरणारा आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान साठी पात्र असतात. टाळेबंदीच्या काळात पोलीस विभागाने अतिशय जोखमीचे कर्तव्य बजावले. त्यामुळेच भंडारा जिल्ह्यातील पोलीस विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी  कोरोना पॉझिटिव्ह आले. या लोकांनी आपला प्लाझ्मा दान करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते.

ठळक मुद्दे५१ पोलिसांचा पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कायदा व सुव्यवस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या भंडारा पोलीस विभागाने कोरोना रुग्णासाठी जीवनदान ठरणारा प्लाझ्मा दान करण्यामध्येही पोलीस विभागाने पुढाकार घेऊन कर्तव्यासोबतच सामाजिक भान जपले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित प्लाझ्मा दान शिबिरात प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पोलीस विभागाच्या या सामाजिक कार्याबद्दल जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी प्लाझ्मा दान करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे बाधित रुग्णांना प्लाझ्मा हा जीवनदान ठरणारा आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्ती प्लाझ्मा दान साठी पात्र असतात. टाळेबंदीच्या काळात पोलीस विभागाने अतिशय जोखमीचे कर्तव्य बजावले. त्यामुळेच भंडारा जिल्ह्यातील पोलीस विभागातील अनेक अधिकारी कर्मचारी  कोरोना पॉझिटिव्ह आले. या लोकांनी आपला प्लाझ्मा दान करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले होते. या आवाहनाला पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तपणे पुढाकार घेऊन ५१ च्यावर कर्मचाऱ्यांनी प्लाझ्मा दान करून विक्रम केला आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. 
प्रत्येकच बाधित होऊन गेलेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा परिणामकारक ठरेल, याची श्वाश्वती नसल्याने प्रारंभी अशा व्यक्तींच्या शरीरातील आरबीडी व ॲण्टीबॉडीची तपासणी करण्यात येते. एका विशिष्ट पातळीपर्यंत याचे प्रमाण आढळल्यानंतर संबंधित व्यक्तीचा प्लाझ्मा उपयुक्त ठरू शकतो की नाही, याचे निदान केले जाते. दरम्यान प्लाझ्मा लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या कल्पनेतून प्लाझ्मा दान शिबिराची संकल्पना पुढे आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि लाईफ लाईन रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवस भंडाऱ्यात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
या शिबिरात पोलीस मोठ्या  प्रमाणात नोंदणी केली आणि मोठ्या संख्येने पोलीस प्लाझ्मा दानासाठी पात्र ठरले व त्यांनी प्लाझ्मा दान केला. पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम व प्रमोद डोंगरे यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. उपजिल्हाधिकारी अर्चना यादव यांनी यासाठी उत्तम समन्वय साधला. तर लाईफ लाईन रक्त पेढीचे डॉ. हरीश वरभे व त्यांच्या चमुनी अतिशय नेटके नियोजन केले. 

प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन
 प्लाझ्मा दान शिबिर रविवारी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात असून नागरिकांनी आरबीडी व ॲण्टीबॉडीची तपासणी तपासणी करून  प्लझ्मा दान करण्याचे  आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. हा प्लाझ्मा शासकीय रुग्णालयात निशुल्क देण्यात येणार आहे.