धुळे ते कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ असते. एरवी रेल्वेने जाणारी जड वाहतूक कोरोना संसर्गामुळ ट्रेलर, ट्रकच्या सहाय्याने होत आहे. परिणामी दुरुस्ती झालेले खड्डे पुन्हा उघडे पडून मोठ्या आकाराचे खड्डे होत आहेत. यात नव ...
सिहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. खरिप हंगामात पाऊ साचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढल्या असता धान पिकांचे रोवनी करिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरात धान पिकांची रोवनी ६५ टक्के झाली आहे. या शिवाय रोवणी ...
दिवसेंदिवस या कंपनीतील कामगार कोरोना बाधित असल्याचे प्रकरण समोर येत असल्याने गावात चिंता व्याप्त आहे. जिल्हा प्रशासनाने यावर तत्त्काळ प्रतिबंधित उपाय न केल्यास जिल्ह्यात सर्वाधिक भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोहाडी ...
राज्यसेवा आयोगाची पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होत आहे. गावी परतलेल्या अनेकांनी महानगरातीलच परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु आता परीक्षेला जायचे कसे असा पेच या परीक्षार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. ...
जिल्ह्यातील इतर नगर पालिकांसह लाखनी नगर पंचायतलासुद्धा शेकडो गरजू, बेघर, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांनी आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी राज्य शासनाकडून एक लक्ष व केंद्र शासनाकडून दीड लक्ष ...
बावनथडी नदी काठावरील घानोड, सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील माफियांनी रेतीची डम्पिंग यार्ड गत वर्षात तयार केला आहे. या यार्डमधील रेतीची विक्री त्यांनी केली नाही. या डम्पिंग यार्डमध्ये एक हजार ब्रास रेतीची साठवणूक असतांना त्यांनी दोन हजार ब्रास ...
भंडारा शहरातील प्रत्येक चौक भगव्या पताकांनी सजविण्यात आले होते. चौकाचौकांत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. येथील गांधी चौकात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भंडार ...
तालुक्यात चुलबंद नदी, पिपरीघाट, शशीकरण नदी, कोदामेडी, सौंदड या भागातून अवैधरित्या रेती उपसा करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. रेतीमाफीया महसूल व पोलीस विभागाला न जुमानता अवैधरित्या रेती चोरुन थोड्याच दिवसात श्रीमंत झाले. श्रीमंतीमुळ ...
बावनथडी नदी काठावर असणाऱ्या घानोड व सक्करधरा गावाचे शिवारात मध्यप्रदेशातील रेती माफियांनी रेतीचा डंपींग यार्ड गेल्या दोन वर्षापूर्वी तयार केला आहे. परंतु या डंपींग यार्ड मधील रेती विक्रीची मुदतवाढ संपल्यानंतर माफियांनी याकडे पाठ दाखविली आहे. त्यांना ...
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश धान व्यापारी शेतकऱ्यांकडून दरवर्षी धानाची खरेदी करतात. धानावरील बोनसचा फायदा घेण्यासाठी हे व्यापारी शेतकऱ्यांकडून सात बारा मागवून त्यांच्या नावाने केंद्रात धान जमा करतात. शेतकऱ्यांच्या नावाखाली धान्य व्यापारी गब्बर झाले असू ...