फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेल्या वाहनाचे हप्ते न भरता १७ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरुन येथील दोघांविरुध्द भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आगामी दोन दिवसात वेग येणार आहे. गेल्या आठवड्याभरापासून निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. उमेदवारांच्या प्रचारसभेत गर्दी जमविण्यापासून तर प्रचार साहित्य वाटपासाठी कार्यकर्ते म्हणून महिला व पुरुषांना बोलविले जाणार ...
भारतीय निवडणूक अयोगद्वारा लोकसभेच्या निवडणुका भंडारा-गोंदिया क्षेत्रात ११ एप्रिल रोजी पार पडणार आहे. निवडणूक आयोगद्वारे सुलभ निवडणुका अंतर्गत अपंग मतदारांना लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होणे सुलभ व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत ...
तुमसर तालुक्यांतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी वनविभागात वेगवेगळ्या तीन गावात रस्त्याच्या कडेला पिवळा पळस बहरल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवारांचे नामांकन छाननीत रद्द झाले. आता २३ उमेदवार रिंगणात असून अर्ज मागे घेण्याच्या २८ मार्च या शेवटच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतात हे स्पष्ट होणार आहे. ...
जनावर तस्करी विरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील आंबागड येथे पोलिसांनी तीन वाहनातून तब्बल २९ बैलांची सुटका करुन तिघांना अटक केली. यावेळी ८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आल ...
सर्वत्र माणुसकी लोप पावल्याची चर्चा होत असताना साकोली येथील नवजीवन कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांनी दाखविलेला माणुसकीचा गहीवर पाहून सर्वच भारावून गेले. कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीच्या वैद्यकीय उपचारासाठी या चिमुकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे गोळा केले. थोडीथोड ...
लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना ठाणा येथे २०० रुपयाची नकली नोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गृहकराची रक्कम ग्रामपंचायतचा कर्मचारी बँकेत भरण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ...