ज्योतिबा व सावित्रीचे कार्य देशासाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:37 PM2019-04-13T22:37:00+5:302019-04-13T22:38:45+5:30

महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाज जीवनाचे नवे तत्वज्ञान दिले. त्याकाळी त्यांनी जगातील सर्व मानव एक आहेत. हे महान सत्य सांगून मर्मभेद व राष्ट्रभेद यांच्या भिंतीवर प्रहार केला. राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान यांच्या पलिकडे पाहण्याची शिकवण दिली.

Jyotiba and Savitri's work are inspirational for the country | ज्योतिबा व सावित्रीचे कार्य देशासाठी प्रेरणादायी

ज्योतिबा व सावित्रीचे कार्य देशासाठी प्रेरणादायी

Next
ठळक मुद्देइसादास भडके : भंडारा येथे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाशपर्व कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा ज्योतीबा फुले यांनी सत्यशोधक समाज जीवनाचे नवे तत्वज्ञान दिले. त्याकाळी त्यांनी जगातील सर्व मानव एक आहेत. हे महान सत्य सांगून मर्मभेद व राष्ट्रभेद यांच्या भिंतीवर प्रहार केला. राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान यांच्या पलिकडे पाहण्याची शिकवण दिली. महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे हे कार्य म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ आहे. त्यांचे हे महान कार्य सिंहाच्या गुहेत शिरून त्यांची आयाळ पकडण्यासारखे होते, असे अभ्यासपूर्ण विवेचन प्रा. डॉ. इसादास भडके यांनी केले.
भंडारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समितीच्या वतीने आयोजित चार दिवसीय प्रकाश पर्वाचे पहिले पुष्प महात्मा फुले जयंती व डॉ.अनित नितनवरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साखरकर सभागृह भंडारा येथे प्रमुख वक्ते म्हणून गुंफताना ते बोलत होते.
व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड होते. विशेष वक्ते म्हणून भदंत डॉ.चंद्रकिर्ती, मेरठ विद्यापीठ उत्तर प्रदेश, सुप्रसिद्ध कवी व अभ्यासक प्रमोदकुमार अणेराव, आंबेडकरी विचारवंत व प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत व समितीचे अध्यक्ष सचिन बागडे उपस्थित होते. डॉ. इसादास भडके म्हणाले, फुल्यांचा राष्ट्रवाद हाच खरा भारतीय राष्ट्रवाद आहे. या समतावादी राष्ट्रवादाची व त्यांच्या अब्राम्हणी अन्वेशन पद्धतीची सुरुवात करून फुल्यांनी भारताला आजच्या धर्मसंकटातून सोडवणारा कालातील वारसा दिला आहे.
प्रमोदकुमार अणेराव यांनी जॉन स्टुअर्ट मिल यांच्या इशाऱ्याची आठवण करून देत म्हणाले, आपण आपले स्वातंत्र कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. जेणे करून तो त्याला प्राप्त अधिकाराचा उपयोग लोकांच्या संस्था उध्वस्त करण्यासाठी करेल.
भारतीय समाजव्यवस्थाने ज्या समाजाचे सामाजिक धार्मीक, मानसिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी सर्व प्रकाराचे अमानवीय शोषण केले होते. त्या शोषीत समाजात विचार आणि आंदोलनाच्या माध्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड क्रांती केली. विज्ञानवादी आणि मानवतावादी बुद्धधम्म पूर्वीच्या अस्पृश्यांना मिळाला आणि धर्मांतरानंतर बौद्ध झाल्यानंतर त्यांच्या जीवनात क्रांतीकारी परिवर्तन झाले असे विचार भदंत प्रा.चंद्रकिर्ती यांनी व्यक्त केले. कवी लोकनाथ यशवंत यांनी कविता वाचून प्रेक्षांना मंत्रमुग्ध केले. .अमृत बन्सोड म्हणाले, सांसदीय लोकशाही ऐवजी धर्माधिष्ठीत लोकशाहीच्या दिशेने प्रवास सुरु आहे. कोणत्याही पक्षाच्या तत्वप्रणालीपेक्षा देश मोठा असावा. देशापेक्षा तत्वप्रणाली नाही. अन्यथा स्वतंत्र्य धोक्यात यायला वेळ लागणार नाही. विचारमंचावर स्मृतीशेष अनिल नितनवरे यांची पत्नी सुनिता नितवरे व राज्याच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्ष माया उके बसल्या होत्या. संचालन अ‍ॅड.डी.के. वानखेडे, प्रास्ताविक सचिन बागडे, संयोजन गुलशन गजभिये केले तर आभार अ‍ॅड.कान्हेकर यांनी मानले. तत्पूर्वी सकाळी फुले वॉर्डातील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन सभा आयोजित करण्यात आली. प्रमुख अतिथी विजय बागडे, महेंद्र गडकरी, सचिन बागडे, अजय तांबे, अमृत बन्सोड, शैलेश मेश्राम, महादेव मेश्राम, एम.डब्लू. दहिवले, रुपचंद रामटेके, प्रशांत सूर्यवंशी, शरद खोब्रागडे, डी.एफ. कोचे, असित बागडे, आहुजा डोंगरे इ.नी. पुष्पांजली वाहिली. मैत्रेय बुद्ध विहार नाशीकनगर येथे समितीतर्र्फं रक्तदान शिबिराचे सुद्धा डॉ.एच.जे. खांडेकर, एम.डी. पॅथालॉजीस्ट यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले. अनेकांनी स्वेच्छेने यात रक्तदान दिले. याकरिता सचिन बागडे, अजय तांबे, प्रशांत सूर्यवंशी, महेंद्र गडकरी, अमृत बन्सोड, शरद खोब्रागडे, आदिनाथ नागदेवे, अमृत बन्सोड, प्रशांत देशभ्रतार इत्यादींनी सहकार्य केले.

Web Title: Jyotiba and Savitri's work are inspirational for the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.