शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

महिनाभरात २७९ कोटींची धान खरेदी; मात्र शेतकऱ्यांना चुकाऱ्याचा पत्ता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:05 IST

Bhandara : खरीप हंगाम संपला, रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात चुकारे मिळणार तरी केव्हा?

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : यंदा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या वतीने १० नोव्हेंबरपासून धान खरेदीला प्रारंभ करण्यात आला. १२ डिसेंबरपर्यंत २०१ शासकीय हमीभाव केंद्रांच्या माध्यमातून १२ लाख १४ हजार ७०३.८५ क्विंटल साधारण धानाची खरेदी करण्यात आली. सुमारे ३५ हजार ७८३ शेतकऱ्यांकडून २७९ कोटी ३८ लाख १८ हजार ८५५ रुपयांच्या धानाची खरेदी झाली. परंतु, महिना लोटला असताना शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा झालेले नाहीत. चुकारे मिळणार तरी केव्हा, असा प्रश्न विचारला जात आहे.

भंडारा जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. खरीप हंगामात साधारणतः १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानावर जिल्ह्याचे ग्रामीण अर्थचक्क अवलंबून आहे. यंदा जिल्ह्यात ऑक्टोबरपासून धान कापणी व मळणीला प्रारंभ झाला. परंतु, दिवाळीच्या काळात एकही शासकीय हमीभाव केंद्र सुरू झालेले नव्हते. 

जिल्ह्यात १० नोव्हेंबरपासून किरकोळ स्वरूपात शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले, त्यानंतर अतिशय संथगतीने शासकीय हमीभाव केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. १२ डिसेंबरपर्यंत २३१ केंद्रांना धान खरेदीची मंजुरी देण्यात आली. २३१ पैकी केवळ २०१ केंद्रातून थेट धान खरेदी सुरू आहे. परिणामी, जिल्ह्यातील काही भागात अद्यापही धान खरेदी सुरू झालेली नाही. दरम्यान धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून बोनसची प्रतीक्षा आहे. ही मागणी हिवाळी अधिवेशनात पूर्ण होण्याची आस आहे. 

लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचा विसर निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याची आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी सध्या मूग गिळून आहेत. सत्ताधारी आल्याच तोयात वावरत आहेत. विरोधक पराभवामुळे निराशेच्या गर्तेत दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

२८ केंद्रांनी खरेदीकडे फिरविली पाठजिल्ह्यात शेतकरी नोंदणीकरिता यंदा २३६ केंद्रांना प्रशासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली. २२१ केंद्रांनी धान खरेदीची तयारी दर्शविला. मात्र, १२ डिसेंबरपर्यंत प्रत्यक्षात ऑनलाइन पोर्टलनुसार २०१ केंद्रांतून जिल्ह्यात धान खरेदी सुरू आहे. २८ केंद्रांनी आयडी सुरु करूनही प्रत्यक्ष धान खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. 

शेतकऱ्यांनी खर्च भागवायचा कसा? शासकीय हमीभाव केंद्रावर धान विकून महिनाभराचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा करण्यात आलेले नाही. रब्बीसाठी पैशांची गरज असताना शेतकऱ्यांनी खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न कायम आहे.

१२ डिसेंबर पर्यंतचा धान खरेदीचा अहवाल तालुका                  खरेदी केंद्र                एकूण खरेदी                  शेतकरी                     एकूण रक्कम भंडारा                          २२                          ९३८९५.९४                     २६८८                        २१५९६०६६२.०० मोहाडी                         १३                           ३१४७०.४२                     ८७२                          ७२३८१९६६.०० तुमसर                          २५                          १०१०९३.१०                     २९०९                         २३२५१४१३०.०० लाखनी                         २८                           १९६३३३.६०                   ६१३३                         ४५१५६७२८०.०० साकोली                        ३३                           २५६०८२.२२                  ७७३१                         ५८८९८९१०६.०० लाखांदूर                       ४३                           २८२५३८.६६                   ८३३३                         ६४९८३८९१८.०० पवनी                           ३७                            २५३२८९.९१                   ७११७                        ५८२५६६७९३.०० एकूण                          २०१                           १२१४७०३.८५                ३५७८३                       २७९३८१८८५५.००

"जिल्ह्यात १० नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत १२ लाख १४ हजार ७०३.८५ क्विंटल साधारण धानाची खरेदी झाली. सुमारे ३५ हजार ७८३ शेतकऱ्यांकडून २७९ कोटी ३८ लाख १८ हजार ८५५ रुपयांच्या धानाची खरेदी झाली असून लवकरच चुकारे होणार आहेत." - एस. बी. चंद्रे, सहायक जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीCropपीकFarmerशेतकरीbhandara-acभंडारा