शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:09 IST

संजय साठवणे। लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : शेतकºयांचा धान घरी येताच व्यापाऱ्यांकडून लूट सुरु झाली आहे. रोखीने पैशाचे आमीष ...

ठळक मुद्देसाकोली तालुका : हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी

संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकºयांचा धान घरी येताच व्यापाऱ्यांकडून लूट सुरु झाली आहे. रोखीने पैशाचे आमीष दाखवत हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. सणासुदीच्या दिवसात आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी व्यापाºयांच्या भूलथापांना बळी पडत आहे. साकोली तालुक्यात हा प्रकार खुलेआम सुरु असून व्यापारी १५०० रुपये क्विंटलने धानाची खरेदी करीत आहेत.यावर्षी अपुऱ्या पावसाने दुष्काळाचे सावट असताना थोडाथोडका धान शेतकऱ्यांच्या घरी आला आहे. दिवाळी सणापुर्वी धान विकून दिवाळी साजरी करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र शासकीय धान खरेदी केंद्रावर वेळेवर पैसे मिळत नसल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत.शासनाने साकोली तालुक्यात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले आहे. त्याठिकाणी उच्च प्रतीच्या धानाला १७७० आणि निम्न प्रतीच्या धानाला १७०० दर निश्चित केला आहे. मात्र यावर्षी या केंद्रावर धान देण्यासाठी सातबारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक घेऊन आॅनलाईन अर्ज करावा लागत आहे. यानंतर जो क्रमांक मिळतो त्यानुसार धानाची विक्री करावी लागते. यात बराच कालावधी जातो. तसेच नगदी पैसेही मिळत नाही. उलट हमाल धान मोजणी करताना ७० किलोच्या पोत्यावर दोन किलो ओल्या धानाच्या नावाखाली अधिक घेतात. तसेच पोते मोजतानाही गडबड केली जाते. त्यामुळे शेतकºयांचे तीन ते चार किलो धान अधिक जातात. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते.आता या संधीचा फायदा व्यापारी घेत आहेत. व्यापाऱ्यांचे दलाल गावोगाव फिरत असून नगदी पैशाचे आमीष देऊन शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी करीत आहेत. १५०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे खरेदी केली जात आहे.अडलेला शेतकरी या व्यापाऱ्यांच्या जाळ्यात अडकत आहे. समोर दिवाळी असल्याने नाईलाजाने तो व्यापाऱ्यांना आपला धान देत आहे. मात्र यातून मोठ्या प्रमाणात शेतकºयांची लूट होत आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि हमीभावापेक्षा कमी किमतीत धान खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आहे.आधारभूत केंद्रावर जादा धान?शासन निर्णयाप्रमाणे आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा धान मोजताना ४० किलो धान व पोत्याचा ६०० ग्रॅम असे एकुण ४० किलो ६०० ग्रॅम धान मोजावे असा नियम आहे. मात्र बहुतांश आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी करून ४० किलो धानाची पावती दिली जाते. शेतकऱ्याकडून १४०० ग्रॅम धान सुकवून अधिकचे घेतले जातात. येथेही शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. याकडे कोणाचे लक्ष दिसत नाही.