शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५० हजारांवर मजुरांना मिळाला रोहयोत रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षीच सुरु होतात. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार व लॉकडाऊनची पार्श्वभूमी लाभली असतानाही भंडारा जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात आर्थिक आधार : सात तालुक्यातील ४०४ ग्रामपंचायती अंतर्गत सुरु आहेत कामे

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५० हजार ३३९ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जिल्हाभरातील ५४५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी ४०४ ग्रामपंचायतीअंतर्गत कामे सुरु आहेत. लॉकडाऊनच्या काळातही मजुरांना रोजगार मिळाल्याने आर्थिक हातभार लाभला आहे.मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षीच सुरु होतात. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार व लॉकडाऊनची पार्श्वभूमी लाभली असतानाही भंडारा जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत. यात भंडारा तालुक्यातील ५५, लाखांदूर ४४, लाखनी ६२, मोहाडी ६१, पवनी ६३, साकोली ५० व तुमसर तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींनी रोहयोची कामे सुरु केली आहेत. यात एकूण सातही तालुक्यांतर्गत २११८ मस्टरवर या सर्व मजुरांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच २५१३ मजुरांना मात्र युआयडी अंतर्गत नोंदणी झालेली नाही.त्या मजुरांनाही रोजगाराची संधीलॉकडाऊन काळात परप्रांतातून किंवा परजिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजुरांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर कामधंदे उपलब्ध नसल्याने परत आले आहेत. अशा मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध होऊ शकतात. काहींनी याचा लाभही घेण्यास सुरुवात केली आहे. नोंदणी करून खात्यातच मजुरीची रक्कम जमा होत असल्याने आर्थिक चणचणही दूर होणार आहे.अशी आहेत तालुक्यातील मजूर संख्यारोहयो अंतर्गत जिल्हाभरात विद्यमान स्थितीत ५० हजार ३३९ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात ५ मे पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यांतर्गत ३ हजार ४६८ मजूर, लाखांदूर १० हजार १३, लाखनी ७ हजार ४५१, मोहाडी ८ हजार १२४, पवनी ९ हजार ६५, साकोली ७ हजार २८० तर तुमसर तालुक्यांतर्गत ४ हजार ३९८ मजुरांना कामे उपलब्ध झाली आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत