दाेन महिन्यात १२ हजाराहून ॲक्टिव्ह रुग्ण १४७ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST2021-06-16T04:46:54+5:302021-06-16T04:46:54+5:30

बाॅक्स सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण माेहाडीत जिल्ह्यात सध्या १४७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात सर्वात कमी ९ रुग्ण माेहाडी तालुक्यात ...

Over 14,000 active patients in 147 months | दाेन महिन्यात १२ हजाराहून ॲक्टिव्ह रुग्ण १४७ वर

दाेन महिन्यात १२ हजाराहून ॲक्टिव्ह रुग्ण १४७ वर

बाॅक्स

सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण माेहाडीत

जिल्ह्यात सध्या १४७ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात सर्वात कमी ९ रुग्ण माेहाडी तालुक्यात आहेत. विशेष म्हणजे माेहाडी तालुक्यात रुग्णांची संख्या अचानक वाढायला लागली हाेती. या तालुक्यात ४ हजार ३५१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले हाेते. त्यापैकी ४,२४७ व्यक्तींनी काेराेनावर मात केली असून, ५५ जणांचा मृत्यू झाला. सध्या भंडारा तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण ५४ आहेत. तुमसर ११, पवनी १७, लाखनी १६, साकाेली २६, लाखांदूर १४ असे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

बाॅक्स

१५ दिवसात केवळ एक मृत्यू

एप्रिल महिन्यात काेराेना मृत्यूचे तांडव अनुभवणाऱ्या भंडारा जिल्ह्याला माेठा दिलासा दिला आहे. ४ जून राेजी एका व्यक्तीचा काेराेनाने मृत्यू झाला. अपवाद वगळता १५ दिवसात जिल्ह्यात कुठेही काेराेनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १,०५५ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला असून, आता मृत्यूसंख्या नियंत्राणात असल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Web Title: Over 14,000 active patients in 147 months