शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा उद्रेक, 149 पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नवीन वर्षात अगदी नगण्य होती. दोन आकडी रुग्णसंख्या तीही ५० च्या आत राहत होती. परंतु गत १० दिवसापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. तपासणीच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक येत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी १५७१ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात १४९ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

ठळक मुद्दे७०१ ॲक्टिव्ह रुग्ण : एकट्या भंडाऱ्यात बुधवारी आढळले ८१ रुग्ण

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत आठ दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मात्र बुधवारी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊन तब्बल १४९ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात एकट्या भंडारा तालुक्यातील ८१ रुग्णांचा समावेश आहे. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७०१ असून सुदैवाने बुधवारी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या सर्वांच्या चिंतेचा विषय झाली आहे.भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नवीन वर्षात अगदी नगण्य होती. दोन आकडी रुग्णसंख्या तीही ५० च्या आत राहत होती. परंतु गत १० दिवसापासून रुग्णसंख्या वाढायला लागली. तपासणीच्या तुलनेत रुग्णांची संख्या अधिक येत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी १५७१ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात १४९ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. भंडारा तालुक्यात ८१, मोहाडी १२, तुमसर २२, पवनी २६, लाखनी १, साकोली ७ रुग्ण आढळून आले. लाखांदूर तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नाही. बुधवारी ३८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, सध्या ७०१ रुग्ण उपचाराखाली आहेत. कुणाच्याही मृत्यूची नोंद नसली तरी  मृतांचा आकडा ३२९ झालेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५२ हजार ७२८ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने घेण्यात आले. त्यात १४ हजार ६२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. भंडारा तालुक्यात ६२४७, मोहाडी ११२३, तुमसर १८८६, पवनी १३८८, लाखनी १५६३, साकोली १७५७, लाखांदूर ६६७ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १३ हजार ६०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ७०१ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा तालुक्यात ३८६, मोहाडी ३९, तुमसर १०१, पवनी ८५, लाखनी ४३, साकोली ३७ आणि लाखांदूर तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे.  

जिल्ह्यात ३७ हजार व्यक्तींना कोरोना लस जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना लसीकरण मोहीम सुरू असून, आतापर्यंत ३७ हजार ५४ व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात आली. त्यात हेल्थकेअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर, ४५ ते ६० आणि ६० वर्षांवरील वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर, मोहाडी, लाखनी येथील जिल्हा, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरण केले जात आहे.  जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. जानेवारी महिन्यात ३,४५४ हेल्थकेअर वर्करला लस देण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात १० हजार ६७३ व्यक्तींना लस देण्यात आली तर, या महिन्यात १६ मार्चपर्यंत २२ हजार ९४७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

रुग्ण बरे होण्याचे  प्रमाण ९२.९६ टक्के जिल्ह्यात अलिकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.९६ टक्के आहे. आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून अलिकडे चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मृत्यूदर २.२४ टक्के असून गत काही दिवसात कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या