शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मृत्यूचे तांडव! काेराेनाने एकाच दिवशी तब्बल 13 जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 5:00 AM

भंडारा जिल्ह्यात दरराेज हजारांवर रुग्ण संख्या येत असून, मृत्यूचा आकडाही वाढत आहे. शुक्रवारी १३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यातील ७, तुमसर आणि पवनी तालुक्यातील प्रत्येकी दाेन, तर लाखांदूर आणि माेहाडी तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुषाचा भंडारा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्दे९ पुरुष व ४ महिलांचा समावेश : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ५१ मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात काेराेना रुग्णसंख्येच्या स्फाेटासाेबतच आता मृत्यूचे तांडवही सुरू झाले असून, शुक्रवारी तब्बल १३ जणांचा काेराेनाने बळी घेतला. यात ९ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये एकट्या भंडारा तालुक्यातील सातजणांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५१ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी काेराेना मृत्यूची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक असून, आतापर्यंत जिल्ह्यात ३९४ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यात दरराेज हजारांवर रुग्ण संख्या येत असून, मृत्यूचा आकडाही वाढत आहे. शुक्रवारी १३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात भंडारा तालुक्यातील ७, तुमसर आणि पवनी तालुक्यातील प्रत्येकी दाेन, तर लाखांदूर आणि माेहाडी तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील ५२ वर्षीय पुरुषाचा भंडारा येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या आयसाेलेशन वाॅर्डात, ८० वर्षीय महिला आणि ६२ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वाॅर्डात, ७४ वर्षीय पुरुष, ५४ वर्षीय महिला आणि ५७ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. लाखांदूर तालुक्यातील ७१ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या आयसाेलेशन वाॅर्डात मृत्यू झाला, तर तुमसर तालुक्यातील एका ७० वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात, तर ३३ वर्षीय तरुणाचा रुग्णालयात आणताना वाटेतच मृत्यू झाला. पवनी तालुक्यातील ५० वर्षीय महिला आणि ५६ वर्षीय पुरुषाचा भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वाॅर्डात आणि माेहाडी तालुक्यातील ७० वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये ९ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.गत पाच दिवसांपासून जिल्ह्यात मृतांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी पहिल्यांदाच मृतांची संख्या दाेन आकड्यात माेजली गेली. १ एप्रिल राेजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला हाेता. २ एप्रिल राेजी तिघांचा, ३ एप्रिलला चार, ४ एप्रिल राेजी एक, ५ एप्रिल राेजी नऊ, ६ एप्रिल राेजी आठ, ७ एप्रिलला नऊ, ८ एप्रिल राेजी तीन,  शुक्रवार ९ एप्रिल राेजी तब्बल १३ जणांचा बळी गेला.

शुक्रवारी १२१७ पाॅझिटिव्ह भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा काेराेना बाधितांच्या संख्येने हजारचा आकडा पार केला. ९ हजार २२० व्यक्तींची चाचणी केल्यानंतर १२१७ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात भंडारा ३८८, माेहाडी १४१, तुमसर २१८, पवनी २०७, लाखनी १३९, साकाेली ५२ आणि लाखांदूर तालुक्यातील ७२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३३ हजार ९८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात २५ हजार ८२१ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १६ हजार ७३१ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली असून, ३९४ व्यक्तींचा काेरेानाने बळी घेतला.

स्मशानभूमीत धगधगतात चिताकाेराेनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी भंडारा लगतच्या गिराेला येथे काेविड स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आली आहे. दरराेज येथे चिता धगधगत असल्याचे दिसून येते. याठिकाणी एकावेळी १४ मृतांवर अंत्यसंस्काराची सुविधा आहे. आता दरराेज मृत्यूचा आकडा वाढत असल्याने अंत्यसंस्कार करण्यास अडचण येत आहे. नगरपरिषदेच्या अखत्यारित असलेल्या या स्मशानभूमीत नगर परिषदेचे कर्मचारी काेराेना नियमानुसार मृतांवर अंत्यसंस्कार करीत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या