शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या माफियाकरवी मांडवीत रेतीची खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या मांडवी आणि तामसवाडी गावाचे नदी पात्रलगत नागपुरच्या मातब्बर माफियाने प्रत्येकी आठ हजार ब्रास रेतीचे डम्पिंग यार्ड तीन वर्षापुर्वी तयार केले. नदी पात्रातून खुलेआम रेतीची चोरी करीत डम्पिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक केली. त्यानंतर रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने त्या माफीयाने डम्पिंग यार्डकडे फिरकने बंद केले.

ठळक मुद्देरॉयल्टी असल्याची बतावणी। शुक्रवारच्या रात्री ५० ट्रकमध्ये रेतीची रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील मांडवी गावाच्या हद्दीत तिन वर्षांपुर्वी नागपुरच्या माफियांनी रेतीची डम्पिंग केली. या डम्पिंगमधील बहुतांश रेती चोरीला गेली. परंतु याच माफियाने शुक्रवारी रात्री अचानक रेतीची खुलेआम विक्री केली असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त केले जात आहे. यात मोठे घबाड करण्यात आल्याच्या शंकेला पेव फुटले आहे.वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या मांडवी आणि तामसवाडी गावाचे नदी पात्रलगत नागपुरच्या मातब्बर माफियाने प्रत्येकी आठ हजार ब्रास रेतीचे डम्पिंग यार्ड तीन वर्षापुर्वी तयार केले. नदी पात्रातून खुलेआम रेतीची चोरी करीत डम्पिंग यार्डमध्ये रेतीची साठवणूक केली. त्यानंतर रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने त्या माफीयाने डम्पिंग यार्डकडे फिरकने बंद केले. मांडवी गावात असणाऱ्या रेतीच्या डम्पिंग यार्डकडे स्थानिक रेती चोरट्यांची नजर गेल्याने त्यांनी एक हजार ब्रास रेतीची चोरी केली आहे. हा डम्पिंग यार्ड अधिकृत नसल्याने त्या माफियाने रेती चोरीची पोलिसात तक्रार केली नाही. गत तीन वर्षांपासून असणाºया डम्पिंग यार्डमधील रेतीत मातीचे प्रमाण अधिक असल्याने रेती चोरट्यांनी नदी पात्रात मोर्चा वळविला होता. नंतर डम्पिंग यार्डमधील रेतीची चोरी त्यांनी थांबविली. शुक्रवारी दिवसभर ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीनच्या सहायाने डम्पिंगमधील रेतीची उचल करण्यात आली आहे.त्यावेळी त्याने रेतीची विक्री रॉयल्टी असल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. यामुळे कुणी विरोध केला नाही. माफियाच्या सोबतीला गावातील अन्य रेती चोरटे होती. त्याचे सहकार्य आणि मदतीने या माफियाने डम्पिंगमधील रेती मुख्य मार्गावर शुक्रवारला दिवसभर जमा केली. नविन डम्पिंग यार्ड तयार केले. रात्री या नविन डम्पिंग यार्डमधील रेतीची विक्री करण्यात आली आहे.५० पेक्षा अधिक ट्रकमध्ये रेतीची वाहतूक तिरोडा मार्गाने करण्यात आली आहे. माफियाकडे रेती विक्रीची रॉयल्टी असतांना रात्री रेती विक्रीची काय आवश्यकता होती, असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित करीत मोठा घबाड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. माफीया व त्यांचे गावातील सहकारी यांनी गावकऱ्यांची दिशाभूल केली आहे.माफीयांचे दबाव आणि वजनात यंत्रणात काम करीत असल्याच्या चर्चांना परिसरात उधाण आले आहे. माफीयाकडे रॉयल्टी शासनाने दिली असल्यास सुर्योदय ते सुर्यास्तपर्यंत डम्पिंगमधील रेतीची विक्री करण्याची ओरड गावात सुरु झाली असून रात्री रेतीची विक्री करण्यात आल्याने झोपमोड होत असल्याची माहिती गावकºयांनी दिली. गावातून रेतीची पुन्हा वाहतूक झाल्यास ट्रक अडविणार असल्याचा इशारा आहे.नियमांची पायमल्लीरेतीची विक्री करतांना पर्यावरणाचे नियम पायदळी तुडविण्यात आले आहे. या परिसरात रेतीची डम्पिंग आणि ट्रकमध्ये उपसा करण्यावर बंदी पोलीस आणि महसूल विभागाने घातली आहे. मात्र मांडवी गावात खुलेआम बंदीला तोडण्यात आले आहे. वैनगंगा नदी पात्रात पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे नदी पात्रातून रेतीची उपसा सध्या बंद असल्याने डम्पिंग यार्ड माफियाचे आता सुगीचे दिवस आले आहे. ही रेती नागपुरला रवानगी करण्यात येत आहे. मांडवी गावातील रेतीची उचल करतांना विरोध नाही, परंतु रॉयल्टी असतांना चोरीच्या पध्दतीने रेतीची उचल करण्यात आल्याने गावकºयांच्या जिव्हारी लागले आहे.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया