शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

जिल्ह्यात केवळ 36 काेराेना ॲक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णसंख्येचा उद्रेक एप्रिल महिन्यात झाला हाेता. मृत्यूचे तांडवही सुरू हाेते. मात्र, आता हळूहळू जिल्हा काेराेनामुक्त हाेण्याच्या वाटेवर आहे. परंतु नियमात सूट मिळताच नागरिक पुन्हा ठिकठिकाणी गर्दी करू लागले आहे. त्यामुळे काेराेना संसर्गाचा धाेका कायम आहे. जिल्हा प्रशासन व आराेग्य यंत्रणेच्या परिश्रमाने जिल्ह्यात आता बाेटावर माेजण्याइतके काेराेनारुग्ण आहेत.

ठळक मुद्देमृत्यू नाही : शनिवारी एक पाॅझिटिव्ह, तर एक व्यक्ती काेराेनामुक्त

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात काेराेनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५० च्या आत आहे. शनिवारी जिल्ह्यात केवळ ३६ काेराेना ॲक्टिव्ह रुग्ण हाेते. विशेष म्हणजे सर्व सातही तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सिंगल डिजीटमध्ये आहे. दरम्यान, शनिवारी कुणाचाही मृत्यू झाला नाही. एक पाॅझिटिव्ह आणि एक रुग्ण काेराेनामुक्त झाला आहे. भंडारा जिल्ह्यात काेराेना रुग्णसंख्येचा उद्रेक एप्रिल महिन्यात झाला हाेता. मृत्यूचे तांडवही सुरू हाेते. मात्र, आता हळूहळू जिल्हा काेराेनामुक्त हाेण्याच्या वाटेवर आहे. परंतु नियमात सूट मिळताच नागरिक पुन्हा ठिकठिकाणी गर्दी करू लागले आहे. त्यामुळे काेराेना संसर्गाचा धाेका कायम आहे. जिल्हा प्रशासन व आराेग्य यंत्रणेच्या परिश्रमाने जिल्ह्यात आता बाेटावर माेजण्याइतके काेराेनारुग्ण आहेत. शनिवारी ३६ व्यक्ती ॲक्टिव्ह हाेते. त्यात भंडारा सात, माेहाडी आणि पवनी प्रत्येकी तीन, तुमसर सहा, लाखनी चार आणि लाखांदूर तालुक्यातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात गावागावांत आणि वाॅर्डावाॅर्डात काेराेना रुग्ण आढळून येत हाेते. परंतु आता काेराेना रुग्ण संख्या कमी हाेत आहे. दुसरीकडे पाॅझिटिव्ह निघण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. शनिवारी ८६६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात केवळ तुमसर तालुक्यातील एक व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आला. आता जिल्ह्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९ हजार ४८५ झाली आहे. तर शनिवारी एक व्यक्ती काेराेनामुक्त झाल्याने काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या ५८ हजार ३२० झाली आहे. जिल्ह्यात कुणाचाही मृत्यू झाला नाही. काेराेनाने जिल्ह्यात आतापर्यंत ११२९ रुग्ण बळी गेले आहेत. जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने नागरिक बिनधास्तपणे फिरताना दिसून येत आहे. काेराेना नियमांचे उल्लंघन करुन बाजारात गर्दी करताना दिसत आहे. अनेकजण तर मास्क न लावता बाजारात फिरत आहेत. दुकानदारही साेशल डिस्टन्सिंगचे पालन करताना कुठेच दिसत नाही. यामुळे काेराेना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे.  नगर परिषदेच्यावतीने एप्रिल महिन्यात नागरिकांवर कडक कारवाई केली जात हाेती. परंतु आता काेणतीच कारवाई हाेताना दिसत नाही. एकीकडे तिसऱ्या लाटेच्या भीतीने प्रशासनाने नियमात बदल करुन बाजारपेठ ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र त्याचेही उल्लंघन हाेत आहे. अशी स्थिती राहिल्यास पुन्हा काेराेना वाढल्याशिवाय राहणार नाही.

५८ हजार ३२० व्यक्ती काेराेनामुक्त- जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख १८ हजार ३१० व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ४८५ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी ५८ हजार ३२० व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली. भंडारा तालुक्यातील २४ हजार २२२, माेहाडी ४२८८, तुमसर ७००१, पवनी ५९०९, लाखनी ६४५५, साकाेली ७५८२, लाखांदूर २८८५ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहे. 

रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.०६ टक्केजिल्ह्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रामण ९८.०४ टक्के आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणेला माेठा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ०.०६ टक्के, मृत्यू दर १.९० टक्के आणि पाॅझिटिव्हीटी रेट ०.११ टक्के आहे. यामुळे आराेग्य यंत्रणेवरील माेठा ताण कमी झाला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या