शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

ईकॉर्नियाच्या एका रोपापासून एक हजार बिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

वैनगंगा नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेणारी ईकॉर्निया ही वनस्पती अत्यंत घातक असून प्रत्येक वर्षी एका रोपासून एक हजार बीया निर्माण होतात. त्यामुळे काही दिवसातच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून जैववैविधतेला धोका पोहचविते. या वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देघातक वनस्पती : वैनगंगा नदीपात्र ईकॉर्नियाने व्यापले, उपाययोजनांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीच्या पात्राला आपल्या कवेत घेणारी ईकॉर्निया ही वनस्पती अत्यंत घातक असून प्रत्येक वर्षी एका रोपासून एक हजार बीया निर्माण होतात. त्यामुळे काही दिवसातच ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढून जैववैविधतेला धोका पोहचविते. या वनस्पतीचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.ईकॉर्निया क्रासीपस ही पाण्यावर तरंगणारी जलीय वनस्पती आहे. ही वनस्पती मुख्यत: दक्षिण अमेरिकेची आहे. या वनस्पतीचे पाने जाळ, चमकदार आणि वनस्पती एक मीटर उंच असते. एका रोपाला आठ ते दहा आकर्षक गुलाबी फुले येतात. भारतात ही वनस्पती १९८० च्या काळात आढळून आली. आता ती संपूर्ण देशात पसरली आहे.भंडारा जिल्ह्यातील नदी-नाल्यातही ईकॉर्निया मोठ्या प्रमाणात दिसून येते. वैनगंगेचे संपूर्ण पात्र या ईकॉर्नियाने व्यापले आहे. उन्हाळ्यात तर लॉनसारखे दृश्य नदीपात्राचे दिसत होते.अत्यंत घातक असलेली ही वनस्पती प्रवाहाला अडथडा निर्माण करते आणि सुर्यप्रकाशाची किरणे दुसऱ्या जलीय वनस्पतीला मिळू देत नाही. त्यामुळे इतर वनस्पतीचा नाश होतो. तसेच जलचर प्राण्यांच्या जीवन चक्रावरही त्याचा परिणाम होतो. जैववैविधतेला धोका ठरणाºया या ईकॉर्नियाचे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करण्याची गरज आहे. त्यासाठी जैविक, यांत्रिक उपाय आवश्यक आहे.यांत्रिक उपायांमध्ये ईकार्नियाचे हालचाली थांबविण्याकरिता बुम्स, तरंगणारे किंवा स्थिर आडकाठींचा उपयोग करण्याची गरज आहे. त्यामुळे वनस्पती इकडून तिकडे पसरणार नाही.वैनगंगा नदीत अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने पुराच्या पाण्यामुळे ही वनस्पती सर्वत्र पसरत आहे. लहान पुलाजवळ तर ती मोठ्या प्रमाणात अडकली दिसून येते. नदीपात्रातून ईकॉर्नियाचे निर्मूलन करण्यासाठी दोन कोटी रूपयांचा निधीही मंजूर झाला आहे.ईकॉर्नियाचे मोठे दुष्परिणाम आहे. यांत्रिक आणि जैविक पद्धतीने निर्मूलन करता येते. ईकॉर्नियावर पाने खाणारे कीटक दिसून येतात. त्यापैकी नीओकेटीनस ब्रुची व नी इकोरनी हे कीटक वनस्पती खाऊन नष्ट करतात.-डॉ. पी.बी. मेश्राम, शास्त्रज्ञ, ट्रॉपीकल फॉरेट रिसर्च इन्स्टिट्यूट.

टॅग्स :riverनदी