वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 16:50 IST2019-05-01T16:50:02+5:302019-05-01T16:50:28+5:30
बुलडाणा - शेंबा येथून कामानिमित्त नांदुराकडे जात असलेल्या दोन युवकांच्या मोटरसायकलला प्रवाशी वाहनाने जबर धडक दिल्याची घटना 1 मे रोजी ...

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार
बुलडाणा - शेंबा येथून कामानिमित्त नांदुराकडे जात असलेल्या दोन युवकांच्या मोटरसायकलला प्रवाशी वाहनाने जबर धडक दिल्याची घटना 1 मे रोजी दुपारी घडली. यामध्ये एका युवकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला तर दुसऱ्यावर बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत.
शेंबा येथील नितीन शेषराव भिडे (वय 18) व कुणाल विनोद भिडे ( वय 18 ) हे दोघे काही कामानिमित्त शेम्बा येथून नांदुरा कडे एमएच 28 -4834 या क्रमांकाच्या मोटरसायकलने निघाले होते. फुली येथील बस स्थानकाजवळ mh28 - 2985 क्रमांकाच्या प्रवाशी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले प्रथम जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबा येथे त्यांना उपचारासाठी आणण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे डॉक्टरांनी देण्यास सांगितले. बुलढाणा येथे उपचारासाठी नेत असताना नितीन शेषराव भिडे याचा मृत्यू झाला तर कुणाल विनोद भिडे त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.