शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत तब्बल दीड हजार पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 00:10 IST

गुरुवारी २२६१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ११७, मोहाडी ११०, तुमसर २९, पवनी ५८, लाखनी २१, साकोली ०८ आणि लाखांदूर तालुक्यात एक असे २४४ रुग्ण आढळून आले. गुरुवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ३३२ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या असून, भंडारातील बाजारपेठेतील वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केली आहे. मात्र त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. 

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, गत दहा दिवसांत तब्बल दीड हजार पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ८६५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरासरी दीडशे रुग्ण दररोज आढळत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. गुरुवारी २४४ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १४६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प होती. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू रुग्णसंख्या वाढायला लागली. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरी दररोज शंभर ते १५० रुग्णांची भर पडत आहे. गत १५ मार्चपासून शंभरच्या वर रुग्ण आढळून येत आहे. १५ मार्चरोजी ८२, १६ मार्च ७२, १७ मार्च १४९, १८ मार्च ९९, १९ मार्च १०७, २० मार्च १३२, २१ मार्च १२३, २२ मार्च ११२, २३ मार्च १९८, २४ मार्च २१९ आणि २५ मार्च रोजी २१४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची एकूण संख्या १५३७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ८६५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात भंडारा ६८०२, मोहाडी ११९०, तुमसर २०२६, पवनी १६४५, लाखनी १६८०, साकोली १८३७, लाखांदूर ६८५ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी २२६१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ११७, मोहाडी ११०, तुमसर २९, पवनी ५८, लाखनी २१, साकोली ०८ आणि लाखांदूर तालुक्यात एक असे २४४ रुग्ण आढळून आले. गुरुवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ३३२ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या असून, भंडारातील बाजारपेठेतील वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केली आहे. मात्र त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. 

सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात

जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गत दहा दिवसांत ७०६ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णातही सर्वाधिक ६८०२ रुग्ण भंडारा तालुक्यातीलच आहे, तर ॲक्टिव्ह रुग्णही भंडारा तालुक्यातच अधिक असून, या रुग्णांची संख्या ६६१ आहे. शहरात कोरोना नियमांचे पालन करताना नागरिक टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी गर्दी होत आहे. अनेक जण मास्क लावत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन गरजेचे झाले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या