शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

अन् थोडक्यात वाचला वृद्धाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 8:39 PM

शहरातील बसस्थानक परिसराला लागलेल्या जुन्या चुंगी नाका येथील चौथ्या क्रमांकाचे सीमेंट गाळ्यातील स्लॅब अचानक कोसळले. यात सुदैवाने एका तरुणाच्या समयसूचकतेमुळे ६० वर्षीय वृद्ध इसमाचे प्राण थोडक्यात वाचले. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देभंडाऱ्यातील घटना : गाळ्याचा स्लॅब अचानक कोसळला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील बसस्थानक परिसराला लागलेल्या जुन्या चुंगी नाका येथील चौथ्या क्रमांकाचे सीमेंट गाळ्यातील स्लॅब अचानक कोसळले. यात सुदैवाने एका तरुणाच्या समयसूचकतेमुळे ६० वर्षीय वृद्ध इसमाचे प्राण थोडक्यात वाचले. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. संतोष कपूर असे या घटनेतून बचावलेल्या इसमाचे नाव असून मोहम्मद अन्सारी असे प्राण वाचविणाºया तरुणाचे नाव आहे.बसस्थानक परिसराला लागून असलेल्या इंग्रजकालीन चुंगी नाका आहे. हा नाका बंद असला तरी याच्या पाठीमागे सीमेंट गाळ्यांचे बांधकाम पालिका प्रशासनाने केले आहे. या बांधकामाला जवळपास तीन दशकांचा कालावधी लोटला आहे. परंतु या गाळ्यांची स्थिती दयनीय झाली असून पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात गळती होत असते. त्यामुळे येथील दुकानदारांनी अनेकदा पालिका प्रशासनाला यापूर्वीही अपघात घडण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र याकडे पालिकेने दुरुस्तीकडे नेहमी कानाडोळा केला.रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास संतोष कपूर हे गाळा क्रमांक ४ मध्ये बसले असताना स्लॅबचा मोठा भाग अचानक खाली कोसळला. याच वेळी बाजूला उभे असलेल्या मोहम्मद अन्सारी या तरुणतुर्क तरुणाने प्रसंगावधान साधून वेळीच कपूर यांना बाहेर ओढले. क्षणात मोठा मलबा दुकानात कोसळला. काही दिवसांपूर्वीही याच गाळ्यातील स्लॅबचा एक तुकडा खाली कोसळला होता. अन्य गाळ्यांचीही अशी स्थिती झाली आहे. या बाबत सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरुगकर, जुनैद खान यासह अन्य नागरिकांनी पालिका प्रशासनाला गाळा दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र त्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली.