शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅफलाईन’ निविदाचे ‘वर्कआॅर्डर’ रखडले!

By admin | Updated: June 29, 2016 00:37 IST

तुमसर व पवनी तालुक्यातील सात मामा तलावांच्या कामांसाठी आॅफलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या.

प्रकरण लघु पाटबंधारे विभागाचे : मर्जीतील कंत्राटदारांसाठी निवडली शक्कलप्रशांत देसाई  भंडारातुमसर व पवनी तालुक्यातील सात मामा तलावांच्या कामांसाठी आॅफलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. ही निविदा १४ जूनला उघडायची होती. मात्र, १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही त्या कामांचे वर्कआॅर्डर देण्यात आलेले नाही. केवळ मर्जीतील कंत्राटदारांना काम देण्याच्या नादात ही प्रक्रिया रखडल्याचा प्रकार समोर आला आहे.जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या मामा तलावांच्या कामांसाठी राज्य शासनाकडून सुमारे तीन लाखांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीत तुमसर तालुक्यातील गर्रा (बघेडा), सितासावंगी व आसलपाणी येथील तीन तर पवनी तालुक्यातील शेगांव, कमकाझरी, सुरभी व मिन्सी या चार ठिकाणच्या मामा तलावांच्या कामांसाठी निधी प्राप्त झाला. ही सर्व कामे तीन लाखांच्या आतील असल्याची माहिती आहे. तवालांच्या कामांसाठी कंत्राटदारांकडून यासाठी लिफापा पध्दतीने (आॅफलाईन) निविदा मागितल्या होत्या. या निविदा १४ जूनला उघडण्याची तारीख प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र, १५ जून ते २६ जूनपर्यंत कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे वैद्यकीय रजेवर होते. दरम्यान, या कामांसाठी आलेल्या निविदांचे लिफापे उघडण्यात आले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून संदीप जांभूळपाणी यांची निविदा सर्वात कमी दराची होती. मात्र, त्यांना काम देण्याची अनास्था व मर्जीतील कंत्राटदारांचे दर जास्त असल्याने कंत्राट देण्याची अडचण निर्माण झाली. त्यामुळे रजेवर असताना पराते यांनी सदर मर्जीतील तिन्ही कंत्राटदारांचे लिफापे नागपूरला बोलवून त्यांना काम देण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मर्जीतील कंत्राटदारांना काम देता यावे, यासाठी १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही कामांचे वाटप किंवा वर्कआॅर्डर दिलेले नाही. यामुळे कमी दर असलेल्या कंत्राटदारानेही आता कंबर कसल्याची माहिती आहे. लघु पाटबंधारे विभागात नवनवे प्रकरण बाहेर येत असून प्रशासन कार्यकारी अभियंत्यांना पाठीशी घालीत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.निविदा उघडण्याचा १५ दिवसांचा कालावधी लोटला असतानाही त्यांचे वर्कआॅर्डर कुणाही कंत्राटदाला देण्यात आलेले नाही. मर्जीतील कंत्राटदारांसाठी यात अनिमितता तर केली नाही ना? किंवा वर्कआॅर्डर देण्यास होत असलेल्या विलंबाबात कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पराते यांच्या ९८२३३९६८६७ या भ्रमणध्वनीवर सायंकाळी ५.५० व ६.१९ वाजता संपर्क साधला असता कॉल उचलला नाही.