शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पावसाचा पत्ता नाही, टंचाईची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 10:12 PM

जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे.

ठळक मुद्देयंदा पावसाची नोंद निरंक : गतवर्षी १ ते १२ जूनपर्यंत १०१ मिमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात अद्यापही पावसाचा थांगपत्ता नाही. त्यामुळे शेतीची कामे रेंगाळली असून गावागावात पाणीटंचाई तिव्र झाली आहे. गत वर्षी १ ते १२ जून या कालावधीत १०१.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा शासकीय दफतरी आतापर्यंत पावसाची निरंक अशी नोंद आहे. जिल्ह्यात कुठेही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली नाही. मृग नक्षत्र लागून चार दिवस झाले आहे. अद्यापही मान्सूनच्या पावसाचे निश्चित नाही.भंडारा भात उत्पादक जिल्हा आहे. भातासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते १२ जून या कालावधीत सरासरी ७८.२ टक्के पाऊस कोसळतो. मात्र यंदा १२ दिवसात एक थेंबही पाऊस कोसळला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत सरासरी १०१.२ मिमी पाऊस झाला होता. पावसाचा थांगपत्ता नाही. दररोज तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम पाणीटंचाईवर झाला आहे. जिल्ह्यातील ६४९ गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता या गांवामध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. बावनथडी, चुलबंद आणि वैनगंगेचे पात्रही कोरडे पडले आहे. नदीतिरावरील गावातील नळ योजना शेवटचा घटका मोजत आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या उपाययोजना अत्यल्प तोकड्या ठरल्या. जिल्हा टँकरमुक्त असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे यंदाचा उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल झाले आहे. अनेक गावात खाजगी टँकरने पाणी आणावे लागत आहे. पाऊस लांबल्यास पाणीटंचाई भीषण होण्याची चिन्हे आहेत. आता सर्वांना पावसाचे वेध लागले असून कधी एकदा धो-धो पाऊस बसरतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.पऱ्हे टाकणे खोळंबलेभात पिकासाठी मृग नक्षत्रात पाऊस झाला की शेतकरी आपल्या शेतात पºहे टाकतात. त्यानंतर पºहे मोठे झाले की त्याची रोवणी केली जाते. मात्र यंदा अद्यापही कुठेच पाऊस पडला नाही. त्यामुळे पऱ्हे टाकण्याचे काम खोळंबले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. त्यांनी पऱ्हे टाकले आहेत. मात्र प्रचंड तापमानामुळे पऱ्हे करपत असल्याचे दिसत आहे. आता सर्व शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.असह्य उकाडाजिल्ह्यात तापमानाने यावर्षी उच्चांक गाठला. गत महिन्याभरापासून पारा ४५ अंशाचा वर आहे. दिवसभर सूर्य आग ओकत आहे. कुलर, पंखे आणि एसीही कुचकामी ठरत आहे. कुलरमधून गरम हवा येत आहे. घरात बसनेही असह्य झाले आहे. रात्री उशिरापर्यंत वातावरण तापलेले असते. त्यातच विजेचा पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे असह्य उकाड्याने जीव कासावीस होतो.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस