शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दहा दिवसात कोरोनाचा बळी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:30 IST

भंडारा जिल्हा कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुरुवातीपासुनच सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊननंतर २७ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतरही ३ महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. परंतु त्यावरही जिल्हा प्रशासनाने मात केली. नवीन वर्षापासून तर कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. गत जानेवारी महिन्यापासून ३८ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.

ठळक मुद्देरुग्णसंख्या नियंत्रणात : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ टक्के तर मृत्यूदर २.३५ टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आली असताना भंडारा जिल्ह्यात मात्र कोरोना रुग्ण नियंत्रणात ठेवण्यात जिल्हा व आरोग्य प्रशासनाला यश आल्याचे दिसत आहे. गत दहा दिवसात कोरोनाने एकाही व्यक्तीचा बळी गेला नाही तर गत फेब्रुवारी महिन्यात केवळ पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१७ टक्के असून मृत्यूदर २.३५ टक्के एवढा आहे. प्रशासन विविध उपाययोजना करीत असल्या तरी नागरिक मात्र बेदरकारपणे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे सर्वत्र दिसते. भंडारा जिल्हा कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुरुवातीपासुनच सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊननंतर २७ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतरही ३ महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली. परंतु त्यावरही जिल्हा प्रशासनाने मात केली. नवीन वर्षापासून तर कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. गत जानेवारी महिन्यापासून ३८ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात जानेवारी महिन्यात ३१ आणि फेब्रुवारी महिन्यात ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मार्च महिन्यात पाच दिवसात कुणाचाही मृत्यू झाला नाही. गत २४ फेब्रुवारी रोजी एका रुग्णाचा मृत्यू कोरोनाने झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. आरोग्य विभागाने कोरोना मृत्यूदर नियंत्रणात ठेवल्याचे दिसून येते.जिल्ह्यात १ लाख ४० हजार ३५० व्यक्तींच्या घशातील स्वॅबची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. त्यात १३ हजार ८९१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यापैकी १३ हजार ८९१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली तर ३२७ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना नियंत्रणात भंडारा जिल्हा आघाडीवर असला तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. 

शनिवारी ४७ पॉझिटिव्ह जिल्ह्यात शनिवारी १५७४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात २९, तुमसर ११, लाखनी ४, मोहाडी, पवनी आणि साकोली तालुक्यात प्रत्येकी १ असे ४७ रुग्ण आढळून आले आहेत. १४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या ३४३ रुग्ण उपचाराखाली आहेत. भंडारा तालुक्यात १९३, मोहाडी १५, तुमसर ५५, पवनी २६, लाखनी ४१, साकोली ८, लाखांदूर ५ असे तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात आहेत. नागरिकांचा मात्र फारसा प्रतिसाद मिळत नाही.

खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण जिल्ह्यातील सहा खासगी रुग्णालयामध्ये कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. त्यात भंडारा येथील इंद्राक्षी आय केअर हाॅस्पिटल, स्पेस हॉस्पिटल, नाकाडे हाॅस्पिटल, लक्ष हॉस्पिटल, तुमसर येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि साकोली येथील पार्वती हाॅस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. प्रती डोज प्रती व्यक्ती २५० रुपये लसीसाठी आकारले जात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या