शिव मंदिरात मृतावस्थेत सापडले नवजात बालक ; राजापूरमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:41 IST2025-12-30T13:40:07+5:302025-12-30T13:41:21+5:30
Bhandara : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत राजापूर येथील शिव मंदिरात मंगळवारी, ३० डिसेंबरच्या पहाटे ५:०० वाजता नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Newborn baby found dead in Shiva temple; stir in Rajapur
लोकमत न्यूज नेटवर्क
नाकाडोंगरी (जि. भंडारा) : तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस स्टेशन अंतर्गत राजापूर येथील शिव मंदिरात मंगळवारी, ३० डिसेंबरच्या पहाटे ५:०० वाजता नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली.
सकाळी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना अगदी मूर्तीच्या उजव्या बाजुला कापडात गुंडाळून ठेवलेले अर्भक दिसले. ही माहिती गोबरवाही पोलिसांना देताच त्यांनी तातडीने धाव घेऊन अर्भकाला नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी बाळ मृत असल्याचे घोषित केले.
मृत अर्भक मुलगा असून त्याचे वजन १.४०० किलोग्रॅम आहे. सात महिन्यात त्याचा जन्म झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास घेतला जात आहे. हे अर्भक कुणी ठेवले असावे, याविषयी शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.