लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाळ विक्री प्रकरणी पोलिसांनी या गुरूवारी ताब्यात घेऊन अटक केलेल्या डॉक्टर डॉ. नितेश वाजपेयी याला न्यायालयाने तीन दिवसांचा पीसीआर मंजूर झाला. त्यामुळे त्याचा मुक्काम आता २२ तारखेपर्यंत पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरकडून अनेक माहिती पुढे येण्याची अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभराच्या घडामोडीत पोलिसांनी आज आणखी दोन आरोपींना अटक केली.
यात पूर्णिमा धुर्वे (३०) आणि उमेश सिंग गहलोत (४८) यांचा समावेश आहे. या दोघांनाही गोंदिया येथून अटक केली असून आता अटकेतील आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे. यापूर्वी लालेश्वरी सदेपाच (३९), सागर शिक्का (३८) आणि डॉ. नितेश वाजपेयी या तिघांची अटक झाली आहे. यापैकी लालेश्वरी सादेपाच न्यायालयीन कोठडीत असून सागर शिक्काची पोलिस कोठडी शनिवारी, २१ फेब्रुवारीला संपणार आहे. आता मुख्य सूत्रधाराला अटक झाल्यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाळाच्या विक्री प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असलेल्या सागर शिक्का याची पोलिस कोठडी वाढविण्यासाठी पोलिसांकडून न्यायालयाकडे विनंती केली जाण्याची शक्यता आहे. भंडारा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली, साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवम विसापुरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार पोलिसांच्या हाती लागल्याने अनेक बाबींची उकल होईल व तपास वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉक्टर वाजपेयीवर यापूर्वी तीन गुन्हे दाखल
बाळाच्या विक्री प्रकरणात पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या डॉ. नितेश वाजपेयी याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदीया येथील रामनगर पोलिस स्टेशनमध्ये एक गुन्हा तसेच गोरेगाव पोलिस स्टेशन मध्येही महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम अंतर्गत गुन्ह्याची नोंद आहे.
Web Summary : In the Bhandara baby selling case, two more individuals have been arrested, bringing the total to five. Doctor Nitesh Vajpayee is now in police custody for three days. Police expect crucial information from the main accused, potentially speeding up the investigation.
Web Summary : भंडारा शिशु विक्रय मामले में दो और गिरफ्तार, कुल पांच हुए। डॉक्टर नितेश वाजपेयी तीन दिन की पुलिस हिरासत में। पुलिस को मुख्य आरोपी से अहम जानकारी मिलने और जांच में तेजी आने की उम्मीद है।