शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

एक एकरातील मिरची पिकात एक लाखांचा निव्वळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM

भंडारा हा भात उत्पादक पट्टा. येथील वातावरण धानासाठी उपयुक्त. मात्र अलिकडे निसर्गाच्या अवकृपेने धान उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. पालांदूर परिसरातही चुलबंद नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती केली जाते. त्यातच पालांदूर येथील अरुण पडोळे यांनी भाजीपाला शेती करण्याचा निर्धार केला.

ठळक मुद्देपालांदुरचा शेतकरी : अरुण पडोळे ठरले शेतकऱ्यांसाठी आदर्श

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : शेती म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. कितीही मेहनत घेतली तरी हाती काहीच उरत नाही, असा शेतकऱ्यांचा अनुभव. मात्र या सर्वांना फाटा देत मेहनतीच्या जोरावर पालांदुरच्या एका शेतकऱ्याने एक एकर मिरची पिकातून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा कमाविला. त्यामुळेच अरुण पडोळे आता पालांदूर परिसरातील शेतकºयांसाठी आदर्श ठरले आहेत. दररोज त्यांच्या शेतावर मार्गदर्शनासाठी शेतकऱ्यांची गर्दी असते.भंडारा हा भात उत्पादक पट्टा. येथील वातावरण धानासाठी उपयुक्त. मात्र अलिकडे निसर्गाच्या अवकृपेने धान उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरले नाही. अनेक शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळले. पालांदूर परिसरातही चुलबंद नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती केली जाते. त्यातच पालांदूर येथील अरुण पडोळे यांनी भाजीपाला शेती करण्याचा निर्धार केला. मेहनत घेत त्यांनी मिरचीची लागवड केली. मजूर समस्येला तिलांजली देत हाती कुदळ, फावडे घेत शेती कसली. हवामानातील बदल, पाण्याची टंचाई आदींचा अभ्यास करून त्यांनी मिरचीची लागवड केली. १५ आॅगस्टला रोप टाकून सप्टेंबर महिन्यात मिरचीची लागवड केली. डिसेंबरमध्ये पहिला तोडा हाती आला. भंडाराच्या बीटीबीमध्ये त्यांना योग्य भाव मिळाला. अवघ्या एक एकरात त्यांनी चार तोड्यातून एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. आणखी तीन चार तोडे शक्य असल्याचे अरुण पडोळे यांनी सांगितले. चुलबंद खोऱ्यात मिरचीची शेती करणारा अरुण पडोळे हा शेतकरी इतरांसाठी आदर्श ठरला आहे.पालांदूर परिसरातील मिरची उत्तम दर्जाची म्हणून प्रसिद्ध आहे. त्या मिरचीला बाजारात इतरांच्या तुलनेत चांगला भाव मिळतो. एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती