शिक्षण, संघटन व चळवळ निर्माण करणे काळाची गरज

By Admin | Updated: January 18, 2016 00:31 IST2016-01-18T00:31:40+5:302016-01-18T00:31:40+5:30

समाजामध्ये असलेली विषत्वाची भूमिका सोडल्याशिवाय सामाजिक एकोपा व बांधिलकी निर्माण होणार नाही.

The need of the hour is to create education, organization and movement | शिक्षण, संघटन व चळवळ निर्माण करणे काळाची गरज

शिक्षण, संघटन व चळवळ निर्माण करणे काळाची गरज

शहापूर : समाजामध्ये असलेली विषत्वाची भूमिका सोडल्याशिवाय सामाजिक एकोपा व बांधिलकी निर्माण होणार नाही. जोपर्यंत समाजात असलेल्या विषारी मानसिकतेच्या लोकांपासून आपण दूर जाणार नाही, तोपर्यंतू बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या समाजाची निर्मिती होणार नाही, असे प्रतिपादन इंजि. प्रभाकर भोयर यांनी केले.
भीममेळावा पंचकमेटी व बौद्ध विहार ट्रस्ट शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात सुरु झालेल्या शहापूर येथील ऐतिहासिक ७२ व्या भीम मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामलाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती सदस्य दर्शन भोंदे, उद्योगपती डॉ. गजानन डोंगरवार,अ‍ॅड.अमरदीप चवरे, सरपंच अरुण कारेमोरे, उपसरपंच अलका रंगारी, प्रा.ममता मेश्राम, इंजि. रुपचंद रामटेके, आरती रंगारी, कविता पाटील, माजी उपसभापती निशांत मेश्राम, सुरेश गजभिये, पौर्णिमा साखरे, दुर्योधन खोब्रागडे, सहासीनी घरडे, भीमराव मेश्राम, आसित बागडे आदी उपस्थित होते. इंजि.भोयर म्हणाले, समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे. मात्र हे समाजप्रबोधन लोकांच्या आचरणात कितपत येते त्यावर समाजाचे उणे होणे किंवा प्रगत होणे ठरत असते. समाज प्रबोधन होऊन सुद्धा समाज मागे का राहतो याचे मुळ आपल्या आचरणात आहे. तसेच शिक्षणाची नवीन व्याख्या स्विकारणे अत्यंत गरजेचे झाले. शिक्षण संघटन व चळवळ निर्माण झाल्याशिवाय बाबासाहेबांना अभिप्रेत समाजाची निर्मिती होणार नाही, असे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी सकाळी भिक्खुनी संघप्रिया यांच्याद्वारा त्रिरत्न वंदना करण्यात आली. तद्नंतर बौद्ध विहाराच्या प्रांगणात पंचशील ध्वजारोहण जिल्हा मुख्य सरकारी वकील विजय दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.प्रविण रामटेके, अ‍ॅड.अमरदिप चवरे, भीमराव भुरे, कृपाण गुरुजी, सरपंच अरुण कारेमोरे, उपसरपंच अलका रंगारी उपस्थित होते.
दुपारी बौद्ध विहार प्रांगणात दिवारू वासनिक यांचे तर्फे भोजनदान वितरीत करण्यात आले. तद्नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या तैलचित्राची गावातील प्रमुख मार्गानी भीमरॅली काढण्यात आली. भीम रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका सहभागी झाले होते. डॉ.आंबेडकरांच्या जयघोषाने व भीम गीतांनी शहापूर गावात बौद्धमय वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी रॅलीचा समारोप बौद्ध विहारात करण्यात आला. यावेळी बौद्ध धर्मिय वधू वर परिचय मेळावा व व्यसनमुक्ती मार्गदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रमासोबतच बुद्ध आंबेडकर प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.
रात्रीला भीम मेळाव्याच्या प्रमुख उद्घाटनानंतर प्रकाश पाटनकर व अश्विनी राजगुरु यांच्या समाजप्रबोधनपर भीम बुद्धावर आधारित मराठी, हिंदी गीत गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीम मेळाव्याचे मुख्य संयोजक मोरेश्वर गजभिये, संचालक राज्य पुरस्कृत सामाजिक कार्यकर्ता अम्रुत बन्सोड व आभार प्रदर्शन बौद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष शालीकराम मेश्राम यांनी केले.
कार्यक्रमाकरिता मोरेश्वर गजभियजे, मनोज चवरे, अशोक भिवगडे, जगदिश डोंगरे, शालीकराम मेश्राम, प्रकाशबाबू गजभिये, मिलिंद खोब्रागडे, देवेंद्र रामटेके, आशिष रामटेके, पांडुरंग बेलेकर, तिर्थराज दुपारे, आशीर्वाद रामटेके, रविंद्र बोरकर, अनमोल गजभिये, बाळासाहेब खोब्रागडे, प्रितम घरडे याच्यासह भीममेळावा पंचकमेटी व बौद्ध विहार ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: The need of the hour is to create education, organization and movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.