शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विकासाकरिता सहकारी संस्थांची गरज

By admin | Updated: July 24, 2014 23:43 IST

‘एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था चालवावी. स्वत:च्या विकासाकरीता संस्था टिकवून विहीत वेळेत कर्ज देणे व घेणे गरजेचे आहे, असे सेवा सहकारी

पालांदूर :‘एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था चालवावी. स्वत:च्या विकासाकरीता संस्था टिकवून विहीत वेळेत कर्ज देणे व घेणे गरजेचे आहे, असे सेवा सहकारी संस्था पालांदूरचे अध्यक्ष दामाजी खंडाईत यांनी वार्षिक आमसभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शनात संबोधले.यावेळी मंचावर जिल्हा सहकारी मंडळ विकास अधिकारी बांगरे, पोलीस पाटील रमेश कापसे, संस्था सदस्य आनंदराव हत्तीमारे, वामन वैरागडे, विजय कापसे, पाथरे, हेमराज कापसे, आत्मा समितीचे सदस्य सुधीर धकाते, भंडारा सब्जी मंडळाचे अध्यक्ष बंडू बारापात्रे, संस्थेचे गटसचिव सुनील कापसे आदी मंडळी उपस्थित होती.यावेळी संस्थेचे अध्यक्ष दामाजी खंडाईत यांनी पिक विमा उतरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. नवीन तंत्रज्ञानाची जोड स्वीकारुन अत्याधुनिक शेती कसावी. शेतीला पुरक व्यवसाय निवडावा, यासारखे मौलिक सल्ले आपल्या भाषणातून दिले.जिल्हा सहकारी मंडळ विकास अधिकारी यांनी संस्था व सभासद यांचे नाते समजवून सांगितले. आत्मा समितीचे सदस्य सुधीर धकाते म्हणाले, शेतकऱ्यांनी अभ्यासातून शेती करावी. परंपरागतेला फाटा देत नवीन शेती पद्धत रुजविण्याची जिद्द मनी बाळगावी. दूरदर्शनवरील शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रम अवश्य बघावे. खताच्या मात्रा आवश्यक तेवढ्याच द्याव्या. प्रति एकराला ४०:२०:२० या प्रमाणात खते वापरावी. किड नियंत्रणाकरीता गराडीच्या पानाचा उपयोग करावा. यावेळी २० मार्चपूर्वी कर्ज परमफेड करणाऱ्या ७२ शेतकऱ्यांना टिफीन डबा प्रोत्साहन म्हणून देण्यात आला.कार्यक्रमाकरीता देवराम तलमले, राधेश्याम पाथरे, टिकाराम कावळे, बाळू खंडाईत, सुनील कापसे, रतीराम नंदनवार आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)