शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

नवेगाव नागझिऱ्यात वाढला पर्यटकांचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:56 AM

भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली. एप्रिल ते जून २०१७ पर्यंत, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत व जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत या व्याघ्र राखीव क्षेत्राला ४६ हजार ९३२ पर्यटकांनी भेटी दिल्या.

ठळक मुद्दे४६ हजार ९३२ पर्यटकांच्या भेटी : ३५ लाख ३९ हजारांचा महसूल

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशविदेशातील पर्यटकांनी हजेरी लावली. एप्रिल ते जून २०१७ पर्यंत, आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ पर्यंत व जानेवारी ते मार्च २०१८ पर्यंत या व्याघ्र राखीव क्षेत्राला ४६ हजार ९३२ पर्यटकांनी भेटी दिल्या.भारतातील ४६ वा व्याघ्र प्रकल्प म्हणून उदयास आलेल्या या व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकांनी भुरळ घातली आहे. वाघ, नीलगाय, बिबट, सांबर, रानगवे, हरिण, अस्वल, रानकुत्री यासारखे वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने येथे पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. एप्रिल १७ ते मार्च १८ पर्यंत ४६ हजार ९३२ पर्यटकांनी येथे जंगल सफारी केली आहे. यात १२ वर्षाखालील पाच हजार २८६ तर १२ वर्षावरील ४१ हजार २५७ पर्यटकांचा समावेश आहे. तसेच एकुण ६५ विदेशी पर्यटकांचे सुद्धा आगमन झाले आहे.एप्रिल ते जून २०१७ मध्ये १८ हजार ४१४ पर्यटकांनी भेटी दिल्या असून त्यांच्याकडून ८ लाख ६ हजार ५९८ रुपये, आॅक्टोबर २०१७ मध्ये ४२४४ पर्यटकांकडून १ लाख ६ हजार ४३५ रुपये, नोव्हेंबर २०१७ मध्ये १९९४ पर्यटकांकडून १ लाख ४० हजार ९३५ रुपये, डिसेंबर १७ मध्ये ७ हजार ३६४ पर्यटकांकडून ३ लाख २१ हजार ९७० रुपये, जानेवारी १८ मध्ये ५ हजार ६५४ पर्यटकांकडून २ लाख ५३ हजार ८८० रुपये, फेब्रुवारी १८ मध्ये ३ हजार ११० पर्यटकांकडून १ लाख ३१ हजार ८७२ रुपये व मार्च १८ मध्ये ५ हजार १५१ पर्यटकांकडून २ लाख ४ हजार ५१० रुपये असे एकुण ४६ हजार ९३२ पर्यटकांकडून २० लाख ६६ हजार २३० रुपयाचा महसूल गोळा झाला आहे.तसेच संपूर्ण आर्थिक वर्षात पर्यटनासाठी एकुण ८९ जड तर ५७५ हलके अशा एकुण ८ हजार ६२८ वाहनांचा उपयोग करण्यात आला. या वाहनांसाठी ११ लाख १५ हजार ३९० रुपयांचा प्रवेश शुल्क वसुल करण्यात आला. तर पर्यटकांनी उपयोग केलेल्या २ हजार ५४५ कॅमेरा वापरातून २ लाख ५१ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.पर्यटकांकडून वसुल करण्यात आलेली रक्कम, वाहनांसाठी वसुल केलेली प्रवेश शुल्क व कॅमेरा शुल्क असा एकुण ३५ लाख ३९ हजार ६७० रुपयांचा महसूल वन्यजीव विभागाला प्राप्त झाला आहे. पर्यावरणपुरक साधनांची निर्मिती, व्यवस्थापन व पर्यटकांचे हित जोपासणाºया अधिकारी, कर्मचाºयांमुळे हे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Nagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्पNavegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य