शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग बनला ट्रान्सपोर्ट हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST

तुमसर : खापा-देव्हाडी मार्गावर खापा शिवारात राष्ट्रीय महामार्गावर जडवाहनांच्या रांगा लागत असल्याने रस्त्यावरच ट्रान्सपोर्ट हबचा प्रत्यय येथे येत आहे. ...

तुमसर : खापा-देव्हाडी मार्गावर खापा शिवारात राष्ट्रीय महामार्गावर जडवाहनांच्या रांगा लागत असल्याने रस्त्यावरच ट्रान्सपोर्ट हबचा प्रत्यय येथे येत आहे. वाहनांच्या रांगांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.

मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर खापा येथे ट्रक टिप्पर जडवाहतूक करणारी वाहने थेट रस्त्यावर उभी केली जातात. यामुळे वाहतुकीलाही खोळंबा होतो. अपघाताला आमंत्रण देणारे दृश्य नेहमीच दिसते. रात्रीच्या सुमारास रस्त्याशेजारी प्रचंड वाहनांच्या रांगा येथे लागून असतात. त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. संबंधित विभागाचे येथे सतत दुर्लक्ष दिसत आहे. नव्याने रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. रस्त्यावर थेट वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रात्री सदर वाहने भोजन व नास्त्याकरिता येथे थांबतात. परंतु, वाहनांची व्यवस्था इतरत्र करण्याची गरज आहे. थेट रस्त्यावर वाहने उभी करण्यास येथे कोणीही मनाई करत नाही. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मोकळ्या जागेत येथे वाहने उभी करण्याची गरज आहे. पर्यायी व्यवस्था येथे नसल्याने वाहन चालक थेट रस्त्यावरच वाहने उभी करतात.