भंडारा जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:41 IST2019-03-04T13:39:21+5:302019-03-04T13:41:13+5:30
भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलवर मागे बसलेला तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास भंडारा येथे घडली.

भंडारा जिल्ह्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकलवर मागे बसलेला तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रशांत भैय्याजी श्रीरंगे (२६) रा.लवारी (उमरी) असे मृताचे नाव आहे. तो साकोली येथे एका सायकल स्टोर्समध्ये कामाला आहे. मित्राच्या दुचाकीवर बसून जात असताना साकोली येथील राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिली. त्यात मागे बसून असलेला प्रशांत खाली फेकला गेला आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेले. विशेष म्हणजे मोटारसायकल चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. समोरील दृष्य पाहून प्रत्येक जण हळहळताना दिसत होता. प्रशांतचे गतवर्षीच लग्न झाले होते. या अपघाताने श्रीरंगे कुटुंबाचा आधार हिरावून घेतला.