शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पुरुषांचीच मक्तेदारी

By admin | Updated: September 27, 2014 23:10 IST

राजकीय सारीपाटावर महिलांना बरोबरीचा दर्जा आणि आरक्षण देण्याच्या घोषणा केवळ ‘राजकीय बाता’ ठरू लागल्या आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात केवळ एक महिला वगळता भंडारा जिल्ह्यात

भंडारा : राजकीय सारीपाटावर महिलांना बरोबरीचा दर्जा आणि आरक्षण देण्याच्या घोषणा केवळ ‘राजकीय बाता’ ठरू लागल्या आहेत. भंडारा विधानसभा क्षेत्रात केवळ एक महिला वगळता भंडारा जिल्ह्यात पुरुषांचीच मक्तेदारी दिसून आली. शनिवारी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यावर शिक्कामोर्तबही झाले.पूर्वी युती आणि आघाडीत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका मागील कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच स्वबळावर होत आहे. २५ वर्षांपूर्वी भाजपा व शिवसेनेने तर १५ वर्षांपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. एवढ्या वर्षानंतर आता स्वतंत्र निवडणुका लढण्याची संधी मिळाली आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना या चारही प्रमुख राजकीय पक्षांसह मनसे, भाकपा, सपा, रिपाईचे विविध गट व अन्य पक्षांमध्ये स्त्रीशक्ती दुर्लक्षित असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत एकच महिलेला तुमसर क्षेत्रात आमदार होण्याची संधी मिळाली होती. राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन विधानसभेच्या काही जागा महिलांसाठी आरक्षित करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. महिलांची सर्वच क्षेत्रातील भरारी आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या बाण्यामुळे किमान एकतरी मतदारसंघ महिलांच्या वाट्याला येणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात एकही मतदारसंघ महिला प्रवर्गासाठी सोडण्याची एकाही राजकीय पक्षाची तयारी नाही.विधानसभा मतदार संघासाठी सक्षम महिला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा यासह अन्य पक्षात आहे. काही अभ्यासू महिला तर पुरुषांपेक्षाही सरस ठरत आहेत. मात्र पुरुषी मक्तेदारी त्यांना सतत मागे लोटताना दिसून आले आहे.सर्वच पक्षात आमदारकीचा दीर्घ अनुभव घेतलेले नेते आहेत. मात्र त्यांची राजकीय भूक अद्याप शमलेली नाही. आपण मागे राहून आपल्या मतदारसंघाची सूत्रे एखाद्या महिलेकडे देण्याची हिंमत एकाही नेत्याने जिल्ह्यात दाखविलेली नाही. उलट ज्या कुणाकडे अशी सूत्रे असतील, त्यांचे दोर कापण्याचाच प्रयत्न केलेला आहे. (शहर प्रतिनिधी)