शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलापेक्षा मोबाईल बिलाला अधिक पसंती

By admin | Updated: February 20, 2015 00:29 IST

घरगुती वीज बिल एकवेळ उशिरा भरले जाईल; मात्र मोबाईलचे बिल प्रत्येक जण वेळेवर भरतात. कारण अलीकडे मोबाइलचा वापर इतका वाढला आहे की,

भंडारा : घरगुती वीज बिल एकवेळ उशिरा भरले जाईल; मात्र मोबाईलचे बिल प्रत्येक जण वेळेवर भरतात. कारण अलीकडे मोबाइलचा वापर इतका वाढला आहे की, मोबाईलशिवाय मनुष्य राहू शकत नाही. मध्यमवर्गीय माणूस मोबाइलवर किती खर्च करतो, मोबइलचे बिल विद्युत बिलापेक्षा कमी असते काय, कोणते बिल भरण्यासाठी नागरिक प्राधान्य देतात? या विषयावर लोकमतने शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये महिन्याला एक हजार रुपयापर्यंत वीज वापरणारे ४५ टक्के ग्राहक आढळून आले. तर, त्या तुलनेत एक हजार रुपयापर्यंत मोबाइलचे बिल भरणारे ५६ टक्के ग्राहक निघाले. मोबाइलवर अधिक खर्च होतो की, वीज बिलावर, असा प्रश्न शहरातील काही निवडक मध्यमवर्गीय कुटुंबांना विचारले असता, ५५ टक्के कुटुंबीयांचा मोबाइलवर होणारा खर्च हा एक हजार रुपयापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. तर ४५ टक्के ग्राहक मोबाईलपेक्षा वीज बिलाला महत्त्व देऊन नियमित वीज बिल भरतात, असे या सर्वेक्षणातून दिसून आले.महत्व दोन्ही बिलांचे असले तरी मुलभूत सुविधा म्हणून नागरिक विजेला प्राधान्य देतात विजच नसेल तर मोबाईल चार्ज तरी कशा करावा. असा प्रतिप्रश्नही काही जणांनी विचारला. याचे उत्तर हो किंवा नाही असे मिळत असले तरी मोबाईलचे बिल विज बिलापेक्षा अधिक येत असल्याचेच निष्पन्न झाले. कुटूंबियातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल असतो. प्रिपेड असो की पोस्टपोड बिल तर येणारच. पैसा भरावाच लागणार. त्यामुळे कुटूंबाचा मासिक बजेटवरही त्याचा परिणाम जाणवत असल्याचेही दिसून आले.मोबाईलचे बिल दिड ते दोन हजार तर कधी हजार रुपयांचा आत येत असल्याचे असे सांगणारे बहुतांश कुटूंब आढळले. विज बिल ५०० ते ७०० रुपयांपर्यंत भरणाऱ्या कुटूंबात मोबाईलचे बिल मात्र १५०० रुपयांपर्यंत जात असल्याचेही तथ्य समोर आले. (प्रतिनिधी)