शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आदर्श ग्राम विकासात्मक योजना

By admin | Updated: November 28, 2015 01:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना प्रणित युती सरकारने कार्यान्वीत केलेली आमदार आदर्श ग्राम ही विकासात्मक योजना असून ...

वाघमारे यांचे प्रतिपादन : सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादभंडारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना प्रणित युती सरकारने कार्यान्वीत केलेली आमदार आदर्श ग्राम ही विकासात्मक योजना असून शासनाच्या लोककल्याणकारी कार्यात लोकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी केले. मोहाडी तालुक्यातील खमारी बुज येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार चरण वाघमारे होते. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, खमारीच्या सरपंच बाना सव्वालाखे, उपसरपंच महेश दमाहे, ग्रामपंचायत सदस्य सचिन बागडे, द्वारका सव्वालाखे, गीता माहुले, सविता दमाहे, वनिता दमाहे, कुवरलाल दमाहे, सोविंदा माहुले, सावलदास दमाहे, उपस्थित होते. यावेळी आमदार वाघमारे म्हणाले, युती सरकार सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असून विकासात्मक योजना कार्यान्वीत करण्यात आलेल्या आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून खमारी गावात कृषी, सिंचन, रस्ते, वीज, पाणी, पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, पाळीव दुधाळ जनावरे, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, व्यसनमुक्ती, गुटखाबंदी यासारख्या विविध प्रकारच्या योजना कार्यान्वीत करून विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. खमारी ग्रामवासीयांनी आमदार आदर्श गाव अभियानात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, नागरिकांनी संत महात्मे आणि थोरपुरूषांच्या सम्यक आदर्शवत विचारांचे अनुकरण करून आणि ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणून व्यसनापासून अलिप्त राहावे तसेच शासन आणि प्रशासनाच्या लोककल्याणकारी विकासात्मक योजनेत सक्रीय सहभाग दर्शवून विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विभागाचा आढावा घेण्यात आला. (नगर प्रतिनिधी)