शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी ठोकले जिल्हा पणन कार्यालयाला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

जिल्ह्यात ७३ आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. गोदामाच्या अभावाने खरेदी मंदावली आहे. परिणामी शेतकºयांना आपला धान उघड्यावरच ठेवावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आधारभूत केंद्रावर शेकडो क्विंटल धान उघड्यावर आहे. गत आठ दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. या पावसात खरेदी केंद्रावरील धान ओले होवून शेतकऱ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देखरेदी केंद्रावर अव्यवस्था : जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधारभूत धान खरेदी केंद्रावरील अव्यवस्थेचा फटका शेतकऱ्यांना बसत असून अवकाळी पावसात शेकडो क्विंटल धान ओले झाले. यानंतरही प्रशासन गंभीरतेने घेण्यास तयार नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शुक्रवारी दुपारी येथील जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले. शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यात ७३ आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू आहे. गोदामाच्या अभावाने खरेदी मंदावली आहे. परिणामी शेतकºयांना आपला धान उघड्यावरच ठेवावा लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आधारभूत केंद्रावर शेकडो क्विंटल धान उघड्यावर आहे. गत आठ दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. या पावसात खरेदी केंद्रावरील धान ओले होवून शेतकऱ्यांना फटका बसत आहे. विशेष म्हणजे धान खरेदी केंद्र वाढवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी हे निर्देश गंभीरतेने घेतले नाही. जिल्हा मार्केटिंग अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेने शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसून केंद्रावरील धान ओले झाले. शेतकऱ्यांनी आपली आपबीती आमदार नरेंद्र भोंडेकर यांना सांगितली.
शुक्रवारी दुपारी ३ वाजता अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर आपल्या समर्थकांसह जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात धडकले. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. परंतु कुणीही समाधानकारक उत्तर देवू शकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदार भोेंडेकर यांनी चक्क कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी अनिल गायधने, बाळू फुलबांधे, विजय काटेखाये, प्रकाश मेश्राम, मुकेश थोटे, राजू ब्राम्हणकर, नरेश बावनकर, नरेश उचिबगले, नामदेव सुरकर, राजेश सार्वे, यशवंत पंचबुद्धे, पुरूषोत्तम टेंभरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना लुटण्याचा गोरखधंदा
अधिकारी आणि व्यापारी मिळून शेतकऱ्यांना लुटण्याचा गोरधंदा करीत असल्याचा आरोप आमदार भोंडेकर यांनी घेतला आहे. सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची दुरावस्था होत आहे. शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.