निमाच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST2021-03-18T04:35:15+5:302021-03-18T04:35:15+5:30

भंडारा जिल्हयामध्येदेखील विविध ठिकाणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. यामध्ये लाखनी येथील समर्थनगरस्थित क्रीडा संकुलमध्ये ...

Massive blood donation camp on behalf of Nima | निमाच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर

निमाच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर

भंडारा जिल्हयामध्येदेखील विविध ठिकाणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. यामध्ये लाखनी येथील समर्थनगरस्थित क्रीडा संकुलमध्ये हे रक्तदान शिबिर घेण्यात येईल. त्याचबरोबर मोहाडी येथे महादेव मंदिर याठिकाणी आणि लाखांदूर तालुक्यातील मासळ येथे डॉ. ब्राह्मणकर क्लिनिक या ठिकाणी हे रक्तदान शिबिर होणार आहे. या भव्य रक्तदान शिबिरामध्ये पत्रकार संघ, लाखनी, लाखनी मित्र परिवार, स्वप्नपूर्ती फाउंडेशन, लाखनी, मॉर्निंग ग्रुप, लाखनी, शिवरुद्रम ग्रुप, सृष्टी नेचर क्लब, पूज्य सिंधी पंचायत लाखनी, स्व. लक्ष्मणराव दोनोडे ट्रस्ट, साद माणुसकीची समूह, पतंजली योग समिती, लाखनी, शिवनीबांध जलतरण संघटना, साकोली, समर्थ महाविद्यालय, लाखनी, नरेंद्र महाराज सेवा मंडळ, लाखनी आदी समाजसेवी संस्थांचे देखील सहकार्य लाभणार आहे. या शिबिराला उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी संदीपजी कदम हे उपस्थित राहतील. शिबिर हे सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि ३ वाजेपर्यंत चालणार आहे.

Web Title: Massive blood donation camp on behalf of Nima