शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मशरुमच्या शेतीतून आर्थिक प्रगतीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:51 IST

दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात आयोजित महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय महिला बचत गटांच्या प्रदर्शनात अनेक जिद्दी व कष्टकरी महिलांची भेट झाली. स्वत:च्या हिमतीवर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना सरसने उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले.

ठळक मुद्देपौष्टिक मशरुमचे उत्पादन : शेती प्रशिक्षणातून अनेकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात आयोजित महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय महिला बचत गटांच्या प्रदर्शनात अनेक जिद्दी व कष्टकरी महिलांची भेट झाली. स्वत:च्या हिमतीवर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना सरसने उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. प्रदर्शन कालावधीत साधारणत: १ लक्ष विक्री झाल्याचे मशरुमचे विविध उत्पादने बनविणाऱ्या नमिताताईंनी सांगितले.स्त्रीला लक्ष्मीचे रुप समजल्या जाते. कोणत्याही कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग त्या घरातील स्त्रीच्या आर्थिक नियोजनाच्या काटकसरीला जाते. अशाच मशरुम शेतीतून स्वत:च्या कुटुंबाचा आर्थिक विकास करणाºया नमिता नारायण इखार.भंडारा जिल्ह्याहतील पवनी तालुक्यातील ब्राम्ही गावातील नमिता इखार यांच्या कुटुंबात दोन मुलं व एक मुलगी. पती शासकीय सेवेत दोनही मुलं मास्टर इन सायन्स (एमएससी) झालेली. पूर्णवेळ गृहणी असलेल्या नमितानी कृषी विभागामार्फत जाम, जेली व लोणचे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. पुढे उद्योजकतेची कास धरुन मशरुम मुलाच्या मदतीने मशरुम(अळींबी) शेतीची तळघरात लागवड केली. मशरुमपासून लोणचे, सूप, पापड, फेसपॅक तयार केले. मशरुम लागवडीसाठी दमट व अंधारे वातावरण पाहिजे. मशरुमचे (अळींबी) उत्पादन हरभरा, तूर, कुटार किंवा धानाचा कोंडा हे निजंर्तूक करण्यासाठी साधारण ते १६ तास बॅरलमध्ये बंद ठेवले जाते. त्यानंतर त्यातून पाणी काढले जाते. व एक किलो मशरुम सीड टाकले जाते ते १०० ते १५० प्रति किलो दराने मिळते. १६ बाय २० इंच आकाराच्या प्लास्टिक बॅगेत कुटार भरले जाते. या आकाराच्या कमीत कमी दहा तर जास्ती जास्त १५ बॅगासाठी एक किलो सीड वापरल्या जाते. मशरुमचे पीक येण्याचा कालावधी हा ४५ दिवसांचा असतो. मशरुमसोबतच त्यांनी त्यांच्या घरासमोरील जागेवर कारली, चवळी आंबाडी, मका, दुधी, भोपळा, दोडका या पिकांची लागवड केली आहे.नमिता इखार यांनी जाम उत्पादनाचा पौष्टिकपणा वाढविण्यासाठी अंबाडीच्या जामचादेखील त्यात उपयोग केला. महिन्याला साधारणत: ४० ते ५० हजाराचे उत्पन्न मशरुम पावडर ते मशरुमचे जाम, लोणचे, मशरुम पापड, मशरुम मिल्क पावडर, मशरुम कुकीज, मशरुम बिस्किट यासारख्या उत्पादनातून मिळतो. पायलट मशरुम फार्म या नावाने पवनी- भंडारा रोडवर त्यांचे फार्म आहे.मशरुमपासून पारंपरिक उत्पादनापेक्षा लवकरच मशरुमची कोल्ड कॉफी सुद्धा तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. नमितासोबत त्यांची मुलं अनंत व श्रीकांत मुलगी शुभांगी त्यांना व्यवसायात मदत करते. मशरुमचे वितरक म्हणून त्या काम करतात. मशरुम शेती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून इतर बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसायासाठी ते प्रेरणा देतात. त्यांच्या उच्च शिक्षित मुलांनी उत्पादन विक्रीसाठी यू-ट्यूब चॅनल व फेसबुकच्या माध्यमातून मदत केली आहे. खरोखर महिन्याला ४० ते ५० हजार उत्पन्न देणा?्या मशरुममधून नमिताताईंनी स्वत:च्या कुटुंबाला आधार दिला आहे.मशरुमचे आरोग्य विषयक फायदेप्रोटीनचे सर्वाधिक प्रमाण, वजन संतुलित करतो, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण करतो, हाडांचे आरोग्य सुधारतो, कॅन्सरपासून प्रतिबंध, व्हीटॅमीन बी, बी-१२ याचा उत्तम स्त्रोत यामध्ये आहे. मशरुम आरोग्यासाठी चांगली असते.