शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

राजापूरच्या ‘यू टर्न’ने घेतले अनेकांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 1:25 AM

तुमसर ते कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील राजापूर ‘यू टर्न’ने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले. अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. अपघात प्रवणस्थळाचा फलकही दिसत नाही.

ठळक मुद्देअपघाताची मालिका : बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष, वळणावर वाढली मोठाली झुडुपं, भरधाव अवैध प्रवासी वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर ते कटंगी आंतरराज्यीय मार्गावरील राजापूर ‘यू टर्न’ने आतापर्यंत अनेकांचे प्राण घेतले. अत्यंत धोकादायक असलेल्या या वळणावर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नाहीत. अपघात प्रवणस्थळाचा फलकही दिसत नाही. उलट या वळणावरच मोठाली झुडूपे वाढली आहेत. मंगळवारी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा राजापूर यू टर्न चर्चेत आला आहे.भंडारा आणि मध्यप्रदेश राज्याला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणजे तुमसर - कटंगी २५३ क्रमांकाचा आंतरराज्यीय मार्ग होय. या मार्गावरून अहोरात्र प्रवासी वाहतूक सुरु होते. त्यासोबतच अवजड वाहनेही धावत असतात. गुळगुळीत असलेल्या या रस्त्यावर नाकाडोंगरी लगतच्या राजापूर शिवारात धोकादायक वळण आहे. काटकोनात असलेल्या या यू टर्न वर समोरून येणारे वाहन दिसत नाही. समोर एकदम वाहन आले की चालकाचे नियंत्रण जाते आणि अपघाताला आमंत्रण मिळते. मंगळवारी सकाळी अशाच पद्धतीने अपघात झाला. मध्यप्रदेशातील बोनकट्टा येथून प्रवासी घेऊन जीप तुमसरकडे निघाली होती. मार्गातील प्रवासी घेत ही जीप राजापूर जवळ पोहचली. त्यावेळी समोरच्या वळणावर चालकाला बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराचे चुरी टाकणारे ट्रॅक्टर अचानक दिसले. ट्रॅक्टरचा समोरील भाग पार करून जीप समोर जाणार त्याच वेळी घात झाला. जीप ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जाऊन आदळली. यात तीन महिला प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तर आठ जणांना गंभीर दुखापत झाली.याच ठिकाणी वळणावर मोठाले झुडूपे वाढली आहेत. या झुडूपांमुळेही समोरून येणारे वाहन दिसत नाही. लहान सहान अपघात तर नित्याची बाब झाली आहे. अपघात प्रवण स्थळ असताना बांधकाम विभागाने या ठिकाणी साधे फलक लावण्याचे सौजन्यही दाखविले नाही. तसेच वाढलेले झुडूपेही तोडले नाही. आतापर्यंत या ठिकाणी अनेकांचे बळी गेले आहेत. मात्र बांधकाम विभाग याकडे लक्ष द्यायला तयार नाही.भंडारा जिल्ह्यात राजापूर सारखीच अनेक अपघात प्रवण स्थळे आहेत. या स्थळांवर कोणत्याही प्रकारची सूचना फलकही लावले नाही. अनेक ठिकाणी गतीरोधकाची गरज असताना गतीरोधकही लावण्यात आले नाही. राजापुरच्या वळणावर दोन्ही बाजूला गतीरोधक असते तर आज तीन महिलांचे प्राण नक्कीच वाचले असते. परंतु बांधकाम विभागाने गतीरोधक लावले नाही. एवढेच नाही तर त्याठिकाणी रस्त्यावर पांढरे पट्टेही मारले नाही. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी बांधकाम विभागाने मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. तर पोलीस आणि परिवहन विभागाने अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश आणण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यात पोलीस आणि परिवहन विभाग असमर्थ ठरल्याने वाहनचालकांचे मनोबल वाढले आहे.अवैध वाहतूकदारांची स्पर्धा अंगलटरस्त्यावरील प्रवासी आपल्यालाच मिळावे यासाठी भरधाव वाहने चालविण्याची जणू स्पर्धाच तुमसर ते कटंगी मार्गावर लागलेली असते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून भरधाव वाहतूक सुरु असते. अनेकदा तर पायदानवरही प्रवासी उभे केले जातात. सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसतात. अवैध प्रवासी वाहतुकीतील वाहने कालबाह्य झाली असून भंगार वाहनातून जीवघेणा प्रवास सुरु आहे. पोलीस हप्ता मिळविण्यात धन्यता मानत आहे. तर परिवहन विभागाचे अधिकारी या मार्गावर आल्यास वाहतूकदार एकमेकांना सूचना करून त्या काळापुरती वाहतूक बंद करतात. परिणामी अपघातात निष्पाप प्रवाशांचे जीव जातात. या अपघाताने अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र याला आवर कोण घालणार असा प्रश्न आहे.

टॅग्स :Accidentअपघात