डोंगरी माईन्समधून होत आहे मँगनीज चोरी ! ६५०० किलो साथ केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:25 IST2026-01-06T14:23:39+5:302026-01-06T14:25:16+5:30
Bhandara : तुमसर तहसीलअंतर्गत प्रतिबंधित डोंगरी माईन्स परिसरातून मॅगनीज (काळा दगड) चोरी व अवैध साठवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

Manganese theft is happening from Dongri mines! 6500 kg of manganese seized
लोकमत न्यूज नेटवर्क
गोबरवाही (भंडारा) : तुमसर तहसीलअंतर्गत प्रतिबंधित डोंगरी माईन्स परिसरातून मॅगनीज (काळा दगड) चोरी व अवैध साठवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी तुमसर यांनी पोलिस स्टेशन गोबरवाही अंतर्गत ३ जानेवारी रोजी एकाच दिवशी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करून मोठी कारवाई केली आहे. ही घटना तुमसर तहसीलमधील मौजा कुरमुडा येथे दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान घडली.
या प्रकरणात राजकुमार हरिचंद मोहनकर (३४, रा. कुरमुडा, ता. तुमसर), जावेद खान (३५ रा. चिखला, ता. तुमसर) तसेच पिंटू डहरवाल (४०, रा. तुमसर) यांना प्रतिबंधित डोंगरी माईन्स परिसरातून अवैधरीत्या मँगनीज चोरी करून घरामध्ये साठवणूक करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून ४० प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेले एकूण २००० किलो मॅगनीज दगड जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ३० हजार रुपये आहे. यासोबतच एक जुनी मोटारसायकल आणि एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच दिवशी कुरमुडा येथे महेश श्रीकिसन राऊत (२७, रा. कुरमुडा, ता. तुमसर) व पिंटू डहरवाल (४०, रा. तुमसर) यांना प्रतिबंधित डोंगरी माईन्स परिसरातून मॅगनीज चोरी करून घरामध्ये अवैध साठवणूक करताना अटक करण्यात आली.
या कारवाईत आरोपींकडून ९० प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेले एकूण ४५०० किलो मॅगनीज जप्त करण्यात आले. त्याची किंमत ६७हजार ५०० रुपये आहे. यासोबतच क्रमांक नसलेली मोटारसायकल व इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फिर्यादी पोलिस हवालदार जयसिंग लिल्हारे यांच्या लेखी तक्रारीवरून गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे.