शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:01 IST

बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित व्यक्ती जामिनावर सुटतात. याबाबत शासनाने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री : बोगस बियाणांच्या कंपन्यांवर गुन्हा दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पीक विमा योजनेसाठी जिल्ह्यात नोडल अधिकारी नेमून राज्यस्तरावर पीक विमा योजनेबाबत योग्य धोरण राबविण्यात यावे. अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे योजनेची रुपरेषा योग्य असणे गरजेचे आहे. पीक विम्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.राज्यस्तरीय खरीपपूर्व हंगाम आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री केदार बोलत होते.भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित व्यक्ती जामिनावर सुटतात. याबाबत शासनाने जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विमा कंपन्यांना एका जिल्ह्यात तीन वर्ष सेवा देणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांना कर्जाची रक्कम त्यांचेपर्यंत पोहचविणे सहज सोपे होईल.तेलंगणातील अवैध बियाण्यांच्या कारखाना बंद करण्याबाबत दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री चर्चा करुन निर्णय घेतील. तसेच अवैध बियाणे विक्रेत्यास जामीन मिळणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. चुकीच्या बियाणांचे प्रकरण राज्यस्तरावर निकाली काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या घोषणेचे स्वागत केले.कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रास्ताविकात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकºयाला मार्गदर्शन, बियाणे वाटप, तसेच मदत करण्यात येत असल्याचे सांगितले. कोल्ड स्टोअरेज प्रक्रिया उद्योग, शेतकरी उत्पादक कंपनी, महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनांची माहिती त्यांनी दिली.प्रगतीशिल शेतकऱ्यांची यादी तयार करुन बँक तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. डिजिटल प्लॉटफार्मचा वापर करुन फेसबुक व सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. कृषी सचिव यांनी प्रझेंटेशनद्वारे राज्याची माहिती दिली. यावेळी दर्जेदार बियाणे, बोगस कारखान्यांवर बंदी, उगवण क्षमता तपासणी, महाबिज, पीक विमा योजना, धान खरेदी, सोयाबीन, कापूस व तुर, खते याबाबत आढावा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात आला.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा