शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Maharashtra Election 2019 ; भंडारात नरेंद्र भोंडेकरांचा २३,६७७ मतांनी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:00 AM

निवडणुकीचा कालावधीत विधानसभा क्षेत्रात कोण मुसंडी मारणार याची चर्चा रंगायची. भंडारा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारासह भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारानेही निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली होती. यात शिवसेनेच्या वाट्याला भंडारा मतदारसंघ न आल्याने नाराज असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंडखोरी केली.

ठळक मुद्देभंडारा मतदारसंघ : पक्षाला दूर सारून मतदारांनी दिली अपक्षाला पसंती, पहिल्या फेरीपासूनच उत्कंठा होती कायम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्याच्या राजकारणात भंडारा विधानसभा क्षेत्र नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. नेहमीच पक्ष उमेदवाराला पसंती देणारा भंडारा मतदारसंघातील मतदार राजाने यंदा अपक्ष उमेदवाराला पसंती देत विजयाची माळ घातली. अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर हे २३ हजार ६७७ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे अरविंद भालाधरे यांचा पराभव केला.निवडणुकीचा कालावधीत विधानसभा क्षेत्रात कोण मुसंडी मारणार याची चर्चा रंगायची. भंडारा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारासह भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारानेही निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली होती. यात शिवसेनेच्या वाट्याला भंडारा मतदारसंघ न आल्याने नाराज असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांसमोर मानस व्यक्त करून निवडणूक लढविली.गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासूनच अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर आघाडीवर होते. शेवट्या फेरीत त्यांनी चांगलीच आघाडी घेतली. भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मध्यंतरीच्या फेरीमध्ये मतांच्या आघाडीचे अंतर घटत असल्याचे समोर येत होते. मात्र त्यानंतर वर्चस्वपणा कायम राहिला. १६ व्या फेरीनंतर चित्र स्पष्ट होत गेले. भोंडेकर यांनी एक लाख १७१७ मते मिळाली. ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली.1,01,717 मिळाली मते

विजयाची तीन कारणे...1भंडारा व पवनी दोनही तालुक्यात नागरिकांच्या गाठीभेटीमुळे ते सातत्याने संपर्कात असायचे. याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला. कार्यकर्त्यांची मने सांभाळून पक्ष बांधणीवरही त्यांनी विशेष लक्ष दिले.2माजी आमदार म्हणून सातत्याने जनसंपर्क ठेवला. अन्यायाला वाचा फोडीत नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य दिले.3जिल्ह्यातील बेरोजगारांना न्याय देण्याची त्यांची वचनबद्धता त्यांना कामी आली.

टॅग्स :bhandara-acभंडारा